महापरीक्षा पोर्टल मार्फत जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा 2019-20 ची ऑनलाईन परीक्षा दि. 25/11/2019 व 26/11/2019 रोजी घेण्यात येणार होती.
तथापि काही कारणांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या पदासाठी सन 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल न करता फक्त सन 2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचीच परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये बदल, इ-मेल व मोबाईल नंबर बदल व आरक्षण संवर्ग या बाबींमध्ये बदल करण्यास लवकरच स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.