Classification of Elements | मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण (आवर्तसारणी)

Dobereiner Triads

डोबेरायनची त्रिके: लिथियम Li, सोडीयम Na, पोटाशियम K ही डोबेरायनची त्रिके असून त्यांचे अणूवस्तुमानांक (अणुभारांक) Li-6.9, Na-23, K-39

Dobereiner Triads Law:

त्रिकांचा नियम: समान गुणधर्माच्या तीन मूलद्रव्यांची त्यांच्या चढत्या अणुभारांकाप्रमाणे (अणुवस्तुमानांकाप्रमाणे) मांडणी केल्यास मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा त्रिकांमधील इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो.

Na चा अणुवस्तुमानांक = (Li चा अणुवस्तुमानांक 6.9 + K चा अणुवस्तुमानांक 39)/2

Na चा अणुवस्तुमानांक = 45.9/2 = 23

डोबेरायन याने सर्वप्रथम प्लॅटिनमचा उत्प्रेरक म्हणून उपयोग केला.

Newlands Law of Octaves | न्यूलँड्सचा अष्टक नियम:

न्यूलँड्सने हायड्रोजनपासून थोरीयमपर्यन्त 56 मूलद्रव्यांची मांडणी केली.

अणुभारांकाच्या चढत्या मूलद्रव्यांची मांडणी केल्यास प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात.

अपवाद: कॅल्शियम (Ca) नंतर येणार्‍या मूलद्रव्यांना हा नियम लागू पडत नाही.

Mendeleev Periodic Law | मेंडेलिव्हची आवर्तसारणी:

मेंडेलिव्हने एकूण 63 मूलद्रव्यांची आवर्तसारणी तयार केली.

आवर्ती नियम: मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकाचे आवृत्तीफल आहेत.

मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एकूण 8 गण आणि 7 आवर्तने आहेत.

मेंडेलिव्हने आवर्तसारणीत काही रिक्त जागा ठेवल्या, त्यानुसार इका-बोरॉन, इका-अॅल्युमिनियम व इका-सिलिकॉन या तीन मूलद्रव्यांचे मेंडेलिव्हने भाकीत केले होते. आधुनिक आवर्तसारणीत पुढे अनुक्रमे स्कॅन्डियम (इका-बोरॉन), गॅलियम (इका-अॅल्युमिनियम) व जर्मेनियम (इका-सिलिकॉन) म्हणून शोधली गेली.

Modern Periodic Table | आधुनिक आवर्तसारणी (मोस्ले-1913):

आधुनिक आवर्तसारणी ‘मोस्ले’ या संशोधकाने मांडली.

तत्व: मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती फल आहेत.

मोस्लेने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुक्रमांकानुसार केली.

आधुनिक आवर्तसारणीची वैशिष्ट्ये:

 • सारणीतील मुलद्रव्याचे स्थान त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपनाशी निगडीत असते.
 • प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेने होते आणि शून्य गणातील पूर्ण भरलेल्या कक्षेने आवर्तनाचा शेवट होतो.
 • आधुनिक आवर्तसारणीत 7 आवर्तने व 18 गण आहेत. (गण-उभ्या ओळी)
 • मूलद्रव्यांचा गणक्रमांक अणूच्या बाह्यतम कक्षेत असणार्‍या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येइतका असतो.
 • पहिले आवर्तन सर्वात लहान आहे. (2 मूलद्रव्ये)
 • दुसरे व तिसरे ही लघु आवर्तने आहेत. (प्रत्येकी 8 मूलद्रव्ये)
 • चौथे व पाचवे ही दीर्घ आवर्तने आहेत. (प्रत्येकी 18 मूलद्रव्ये)
 • 6 वे आवर्तन सर्वात दीर्घ आवर्तन आहे. (32 मूलद्रव्ये)
 • 7 वे आवर्तन अपूर्ण आहे.
 • मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आधुनिक आवर्तसारणीचे S, P, D आणि F अशा चार खंडांत विभाजन.
 • प्रसामान्य मूलद्रव्ये – S व P खंडांतील मूलद्रव्ये. (18 वा गण वगळता.)
 • लँथेनाईड व अॅक्टिनाईड श्रेणीमध्ये प्रत्येकी 14 मूलद्रव्यांचा समावेश.
Modern Periodic Table

Types of Element | मूलद्रव्यांचे प्रकार:

निष्क्रिय वायु मूलद्रव्ये:

यांच्या अणूंतील बाह्यतम कक्षांसह सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. शून्य गणातील मूलद्रव्ये निष्क्रिय वायु मूलद्रव्ये आहेत. त्यांना ‘राजवायू’ म्हणतात.

सामान्य मूलद्रव्ये:

या मूलद्रव्यांच्या फक्त बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. IA ते IIA आणि IIIA ते VIIA गणातील मूलद्रव्ये सामान्य मूलद्रव्ये आहेत.

संक्रामक मूलद्रव्ये:

या मूलद्रव्यांच्या अणूंच्या शेवटच्या (बाह्यतम) दोन कक्षा अपूर्ण असतात. IIIB ते IIB गणातील मूलद्रव्ये ही संक्रामक मूलद्रव्ये उत्प्रेरकाचे कार्य करतात.

आंतरसंक्रामक मूलद्रव्ये:

बाह्यतम तीन कक्षा अपूर्ण असतात. लँथेनाईड व अॅक्टिनाईड्स या गटातील मूलद्रव्यांचा यामध्ये समावेश होतो. या मूलद्रव्यांना आवर्तसारणीच्या तळाशी स्वतंत्र स्थान आहे.
प्रातींनिधिक मूलद्रव्ये: तिसर्‍या आवर्तनातील मूलद्रव्ये.
Na, Mg, Al, Si, P, S, Cl, Ar ही मूलद्रव्ये. यापैकी सोडीयम (Na) चा अणू सर्वात मोठा, तर क्लोरिन (Cl) चा अणू सर्वात लहान असतो.

हॅलोजन मूलद्रव्ये:

17 व्या गणातील मूलद्रव्ये.
फ्लोरिन (F), क्लोरीन (Cl), ब्रोमिन (Br), आयोडीन (I) ही मूलद्रव्ये.
फ्लोरिन (F) हे तीव्र ऑक्सिडिकारक आहे. आयोडीनचा अणू सर्वात मोठा असतो. हॅलोजन मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असून त्यात 7 इलेक्ट्रॉन्स असतात.

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us