MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF । MPSC Syllabus PDF in Marathi

MPSC Exam Syllabus

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी गोष्टी माहित असाव्यात. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात. यामध्ये राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा, महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा इत्यादी परीक्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

राज्यसेवा परीक्षा अभ्यासक्रम | State Service Exam Syllabus with PDF

राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये 100 गुणांचे 2 पेपर असतात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. या परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असते. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी 2 तासांचा वेळ असतो. 

राज्यसेवा मुख्य परीक्षेत दोन टप्पे असतात. पहिल्या टप्यात लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत सहा पेपर घेतले जातात. या सर्व पेपरचे मिळून 800 गुण असतात. भाषा क्रमांक 1 मधील दोन्ही भागांकरिता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असते. हा पेपर पारंपरिक किंवा वर्णनात्मक पद्धतीचा असतो.
भाषा क्रमांक 2 मधील दोन्ही भागांकरिता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असते. त्यामध्ये दोन भाग असतात.
1. मराठी भाषेचे प्रश्न 1 ते 50
2. इंग्रजी भाषेचे प्रश्न 51 ते 100
यानंतर दुसरा टप्पा मुलाखतीचा असतो. मुलाखत ही 100 गुणांची असते. 

राज्यसेवा परीक्षा अभ्यासक्रम

महाराष्ट्र गट-ब  गट-क परीक्षा अभ्यासक्रम। MPSC Group B and Group C Exam Syllabus with PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेमार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या तीन पदांची भरती करण्यात येते. महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब व गट-क पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते.
संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 हा सामाईक असून हा पेपर एकाच दिवशी एकत्र घेण्यात येतो. मुख्य परीक्षेचा पेपर 2 मात्र पदानुसार वेगवेगळा घेण्यात येतो. महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षेत पेपर क्र.1 संयुक्त प्रकारचा व पेपर क्र.2 स्वतंत्र प्रकारचा असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात. 
मुख्य परीक्षा – 400 गुण (पेपर क्र. 1 संयुक्त व पेपर क्र. 2 स्वतंत्र)

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब व गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

मराठी अनुवादक अभ्यासक्रम। MPSC Marathi Translator Syllabus PDF

मराठी अनुवादक परीक्षा दोन टप्यांत घेण्यात येते. पहिल्या टप्यात 160 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. दुसऱ्या टप्प्यात 40 गुणांची मुलाखत घेण्यात येते. मुलाखतीच्या एकूण 40 गुणांपैकी, अनुवादक चाचणीकरिता 20 गुण व मुलाखतीकरिता 20 गुण असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाची PDF पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

MPSC Marathi Translator exam is conducted in two stages. In first stage there is a written exam having 160 marks. Second stage consists of an Interview for 40 marks. In Interview 20 marks are for Translation Test and 20 marks for Interview. Click the link given below to see Syllabus of Marathi translator in PDF.

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा अभ्यासक्रम। AMVI/RTO Syllabus PDF

राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क चे पद आहे. ही परीक्षा दोन टप्यात घेण्यात येते. पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा असून 100 गुणांसाठी तर मुख्य परीक्षा 300 गुणांची घेण्यात येते. मुख्य परीक्षेच्या यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचाल अभियांत्रिकी या विषयाच्या Section A मधील प्रश्न अनिवार्य असतील मात्र, Section B किंवा Section C यापैकी एकाच Section मधील प्रश्न उमेदवाराने सोडवायचे आहेत. या सर्व पेपरचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Assistant Motor Vehicle Inspector or AMVI or RTO exam is conducted in two stages. In first stage there is a single paper having 100 marks. In second stage exam there is a paper having 300 marks. The syllabus of AMVI mains exam is given below. In this Section A is Compulsory and from Section B & C only one section is compulsory. Section A has 120 Questions for 240 marks. Section B or C has 30 questions for 60 marks. Clink on the given link below to see detailed syllabus with PDF.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा अभ्यासक्रम PDF। Maharashtra Agriculture Services Exam Syllabus PDF

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा एकूण तीन टप्यांत घेण्यात येते.
1. पूर्व परीक्षा
2. मुख्य परीक्षा
3. मुलाखत
पूर्व परीक्षा 200 गुणांची, मुख्य परीक्षा 400 गुणांची तर मुलाखत ही 50 गुणांची असते. या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम PDF पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Agriculture Service exam is conducted in three stages. Preliminary exam is conducted for 200 marks. Mains exam is for 400 marks. The Interview has 50 marks. Click the link given below to see detailed syllabus in PDF.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा अभ्यासक्रम | MPSC Engineering Services Syllabus with PDF

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण तीन टप्यात घेण्यात येते. 1. संयुक्त पूर्व परीक्षा 2. प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र मुख्य परीक्षा 3. प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र मुलाखत. स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी संवर्गातील भारतीकरिता एकाच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते. संयुक्त पूर्व परीक्षेत एकच प्रश्नपत्रिका असून 100 गुणांसाठी 100 प्रश्न असतात. मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांसाठी घेण्यात येते. मुख्य परीक्षेत प्रत्येक संवर्गासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात येते. संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Maharashtra Engineering Services exam is conducted in three stages. 1. Combined preliminary exam 2. Mains exam for each category 3. Separate Interview for each category. A single Combine Exam is conducted for Civil Engineering, Electrical Engineering and Mechanical Engineering. For MPSC Engineering Services Preliminary exam there is only one Question paper which includes 100 questions for 100 marks. There are two papers in Mains exam. Each paper has 200 marks. Mains Exam is conducted separately for each category. Click on the following link to see detailed syllabus of Maharashtra Engineering Services Exam. 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम PDF
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम PDF
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम PDF
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम PDF

महाराष्ट्र वन सेवा अभ्यासक्रम | Maharashtra Forest Services Syllabus PDF

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा तीन टप्यांत घेण्यात येते.
पूर्व परीक्षा – 100 गुण
मुख्य परीक्षा – 400 गुण
मुलाखत – 50 गुण
पूर्व परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी असून ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Maharashtra Forest Services Exam is conducted in three stages-Preliminary exam, Mains exam and Interview. Click on the link given below to see full detailed syllabus with PDF.

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम PDF
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम PDF

तुम्हाला जर आणखी कोणत्या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

हे पण पहा

Chat with us