ग्रामसेवक भरती संपूर्ण माहिती | Gramsevak Bharti All Details

येथे खाली तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे.

ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification for Gramsevak

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) किंवा समतुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण

किंवा

शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम)

किंवा

शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (BSW)

किंवा

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येते. मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येते.

आणि

संगणक हाताळणी/वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असते.

D.O.E.A.C.C. सोसायटीच्या CCC किंवा महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचेकडील MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा | Gramsevak Age Limit

  • उमेदवार हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व 38 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
  • मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षे
  • अपंग उमेदवार/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त 45 वर्षे
  • स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य 45 वर्षे
  • अंशकालीन कर्मचारी 55 वर्ष
  • सन 1991 च्या जनगणना/सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी 45 वर्षे
  • उच्च गुणवत्ताधारक खेळाडूच्या बाबतीत 43 वर्षे 
  • माजी सैनिकांसाठी 45 वर्षे वयोमर्यादा
  • अनाथ मुलांसाठी 38 वर्षे
  • खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) 43 वर्षे

ग्रामसेवक भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम | Gramsevak Syllabus

उमेदवारांची 200 गुणांची (100 प्रश्न) लेखी परीक्षा घेण्यात येते.

लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान (15 प्रश्न), बौद्धिक चाचणी (15 प्रश्न), तांत्रिक ज्ञान (40 प्रश्न), मराठी (15 प्रश्न) व इंग्रजी (15 प्रश्न) या विषयांवर प्रश्न विचारले जातात.

मराठी विषयाचे प्रश्न मराठी भाषेत, इंग्रजी विषयाचे प्रश्न इंग्रजी भाषेत व बाकीचे सर्व प्रश्न दोन्ही भाषेत (मराठी + इंग्रजी) असतात.

तांत्रिक प्रश्नांचा दर्जा पदविकेचा दर्जा असेल व बाकी सर्व प्रश्नांचा दर्जा 12 वी असतो.

परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असतो.

चुकीच्या प्रश्नासाठी कोणतेही नकारात्मक गुण नसतात.

या परीक्षेत किमान 45% गुण आवश्यक असतात.

ग्रामसेवक भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF
Chat with us