धर्मादाय संघटना गट-ब व गट-क सरळसेवा भरती – 2025 (179 जागा)

धर्मादाय संघटना गट-ब व गट-क सरळसेवा भरती - 2025 (179 जागा)

धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार गट-ब (अराजपत्रित) व गट-क मधील एकूण 179 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. 11/09/2025 ते 03/10/2025 पर्यंत आहे.  नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

 

धर्मादाय संघटना भरती 2025 संपूर्ण माहिती

संस्था:

धर्मादाय संघटना

एकूण पदसंख्या:

179 जागा

भरती प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ:

https://charity.maharashtra.gov.in/mr-in

 

पदांबद्दल सर्व माहिती

अ. क्र.

पदाचे नाव:

शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा

01

विधी सहाय्यक, गट-ब (एकूण 03 पदे)

अ. सांविधिक विद्यापीठाची विधी मधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता.

ब. खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार.

अमागास/खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे  मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ: 18 ते 43 वर्षे दिव्यांग उमेदवार : 18 ते 45 वर्षे (वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : 01 नोव्हेंबर 2025)

02

लघुलेखक (उच्च श्रेणी), गट-ब (एकूण 02 पदे)

अ.  माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण.

ब.लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

03

लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), गट-ब (एकूण 22 पदे)

अ.  माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण.

ब. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

04

निरीक्षक, गट-क (एकूण 121 पदे)

अ.  उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी.

05

वरिष्ठ लिपिक, गट-क (एकूण 31 पदे)

अ.  उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी.

ब. उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा यथास्थिती मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

 

निवड पद्धती

·         परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील.

·         विधी सहाय्यक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांचा निवडसूचीसाठी गृहीत धरण्यात येईल.

·         लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या पदाकरिता परीक्षेचे गुण 120 व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. व्यावसायिक चाचणी 80 गुणांची असेल. जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांचा निवडसूचीसाठी गृहीत धरण्यात येईल.

·         जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल.

 

महत्वाचे दिनांक

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक:

दिनांक 11 सप्टेंबर 2025

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:

दिनांक 03 ऑक्टोबर  2025 रोजी 23:55 वाजेपर्यंत

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक:

ऑक्टोबर - नोव्हेंबर 2025

 

अर्ज फीस

अमागास / खुल्या प्रवर्गासाठी

1000 रुपये

मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ:

900 रुपये

माजी सैनिक

00 रुपये

 

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

 

तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर : 7996065888, 022-24976422, 24935434, 24930499, occheadoffice@gmail.com