महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सर्व माहिती । Home Guard Bharti 2024
This Article Contains
Toggleगृह विभागामार्फत होमगार्डस्ची भरतीची प्रक्रिया राबविली जात असून, सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 34 जिल्ह्यात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018-19 या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम फिजिकल क्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.त्यामुळे महा होमगार्ड भरती 2024 साठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. होम गार्ड भरती PDF, प्रारंभ आणि शेवटची तारीख, वेळापत्रक, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया सर्व माहिती येथे खाली देण्यात आली आहे. या भरतीचे सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
होमगार्ड संघटना : देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी, तसेच आपत्कालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना शासन संचालित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुनःनोंदणीकृत करता येते.
होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस काळासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात.
होमगार्डना देय भत्ते | Home Guard Salary
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षणकाळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो.
होमगार्ड पदासाठी पात्रता | Home Guard Qualification
शैक्षणिक पात्रता | Home Guard Educational Qualification
कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC)
शारीरिक पात्रता | Home Guard Physical Qualification
- वय: 20 ते 50 वर्ष (दि. 31/07/2024 रोजी)
- उंची : पुरुषांकरिता – 162 सेमी. व महिलांकरिता – 150 सेमी.
- छाती : (फक्त पुरुष उमेदवारांकरिता) (न फुगविता किमान 76 सेमी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक)
आवश्यक कागदपत्रे | Home Guard Bharti 2024 Documents
- रहिवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
- तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्र
- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
- 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
शारीरिक क्षमता चाचणी | Maharashtra Home Guard Bharti 2024 Physical Test Details
अ) धावणे
पुरुष उमेदवारांची 1600 मी. धावण्याची चाचणी घेतली जाते. ही चाचणी 20 गुणांची असते.
महिला उमेदवारांची 800 मी. धावण्याची चाचणी घेतली जाते. ही चाचणी 25 गुणांची असते.
या चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी किमान 10 गुण मिळविणे आवश्यक राहील.
गुणांची विभागणी खाली दिल्याप्रमाणे असते.
ब) गोळाफेक – पुरुष उमेदवारांकरिता
गोळाफेक चाचणी 10 गुणांसाठी घेण्यात येते.
गुणांची विभागणी खाली दिल्याप्रमाणे असेल.
गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक राहील.
क) गोळाफेक – महिला उमेदवारांकरिता
गोळाफेक चाचणी 10 गुणांसाठी घेण्यात येते.
गुणांची विभागणी खाली दिल्याप्रमाणे असेल.
गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक राहील.
ड) तांत्रिक अर्हता गुण:
तांत्रिक अर्हतेसाठी 10 गुण देण्यात येतील. गुणांची विभागणी खाली दिल्याप्रमाणे असेल. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतेचे गुण विचारात घेतले जातील.
नोंदणी अर्ज भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा | Home Guard Bharti 2024 Online Form Date
- एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
- उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.
- अर्ज सबमिट केल्यानंतर Print Registration Form या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावयाची आहे. त्यावर आपला फोटो चिटकवयाचा आहे. मराठीमधील आपले नाव स्वतः लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती भरायची नाही.
- कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना वर दिलेली कागदपत्रे उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. दोन फोटो व मूळ कागदपत्रे नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहतील.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सबमेनू निवडावा. सर्वप्रथम जिल्हा Select करावा. त्यानंतर आपल्या हद्दीत येणारे पोलीस ठाणे Select करावे. सर्व माहिती लक्षपूर्वक भरावी. अर्ज SUBMIT केल्यावर पुढील पेजवर आधार क्र. आणि जन्मदिनांक भरून प्रिंट काढावी. व येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.
होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
Home Guard Bharti 2024 Apply Online
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा PDF
अर्ज अप्लाय लिंक
होमगार्ड भरती 2024 चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा.