राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023
This Article Contains
Toggleराज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 सर्व अपडेट्स
या पेजवर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 च्या भरतीविषयीचे सर्व अपडेट्स मिळतील.
Update 09-06-2023
राज्य उत्पादन शुल्क भरतीला स्थगिती | Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Adjourned
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट-क) आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 30/05/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर भरतीप्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्याअनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित भरतीप्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, ते अर्ज ग्राह्य धरले जातील. परंतु अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास कळवण्यात येईल. तसेच भारतीप्रक्रियेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
Update 01-06-2023
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Advertisement
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 दरम्यान असेल.
राज्यस्तरीय संवर्गातील पदे
- लघुलेखक (निम्नश्रेणी) – 5 जागा
- लघुटंकलेखक – 16 जागा
जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
- जवान, राज्य उत्पादन शुल्क – 371 जागा
- जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – 70 जागा
आरक्षणानुसार जागांचा तपशील पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
30 मे 2023 ते 13 जून 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
परीक्षा शुल्क
खालील तक्त्यामध्ये विविध पदांसाठी लागणारे शुल्क देण्यात आले आहे.
Apply for State Excise Department Recruitment 2023
संपर्कांसाठी मोबाईल क्रमांक
7353926663