तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | Talathi Bharti Exam All Details

तलाठी हा महाराष्ट्र महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. तलाठी गाव पातळीवरील नोंद वह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठ्याच्या कार्यालयाला सज्जा म्हणतात. साधारणतः 1 ते 3 गावांसाठी एक तलाठी नेमून दिला जातो. गावातील गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठ्याचा निकटचा वरिष्ठ अधिकारी असतो. मंडळ अधिकाऱ्यावर तहसीलदाराचे नियंत्रण असते.

Qualification Required for Talathi Bharti Exam | तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता

 • जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अर्हता प्राप्त केलेली असावी.
 • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे.
 • मराठी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक. माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना मराठी/हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणीक पात्रता:

 • खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
 • खेळाडूने सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी.
 • खेळाडूंसाठी आरक्षणाबाबत क्रीडाविषयक अर्हता अर्जासोबत क्रीडा विषयक प्रमाणपत्राची संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण यांचेकडील पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.

माजी सैनिकांच्या अर्हतेबाबत:

 • पदवी परीक्षा ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एजुकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात.

Talathi Age Limit | वयोमर्यादा

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 पेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (SEBC आणि EWS उमेदवारांसाठी ही सवलत लागू राहणार नाही)
 • पदवीधारक/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी: कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
 • खेळाडू उमेदवारांसाठी: विहित वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि, उच्चतम वयोमर्यादा 43 इतकी राहील.
 • अपंग उमेदवारांसाठी: उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष इतकी राहील. तथापि अपंग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान अपंगत्वाचे प्रमाण 40 टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी: सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.
 • माजी सैनिक उमेदवारांसाठी: माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील.
 • स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी: सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.

Salary for Talathi | तलाठी वेतन

 ग्रेड पे.  5200 ते 20800  रु.

Syllabus for Talathi Bharti Exam | तलाठी अभ्यासक्रम

परीक्षेचे स्वरूप

तलाठी भरती परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा प्रकारे तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते. यामध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), सामान्य ज्ञान विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) व गणित व बुद्धिमत्ता विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) विचारले जातात.

या परीक्षेसाठी एकूण दोन तासांचा वेळ असतो.

मराठी

समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम व सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

इंग्रजी

Vocabulary, Synonyms and Antonyms, Proverbs, Tense and kinds of Tense, Question tag, Use proper form of verbs, Spot the error, Verbal, Phrases comprehension, Passage, Spellings, Sentence, Structure, One word Substitutions.

अंकगणित व बुद्धिमत्ता

अंकगणित

अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ

बुद्धिमत्ता

अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक अक्षर आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

सामान्य ज्ञान

महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती,

चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन

Documents Required for Talathi Bharti Exam | तलाठी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे/प्रमाणपत्रे

 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

 • वय प्रमाणपत्र

 • अनुभव प्रमाणपत्र

 • उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांत अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही, सदर परीक्षार्थींकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परीक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांतदेखील अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही. उपरोक्त बाबी फक्त महाराष्ट्र राज्यात जन्म झालेल्या परीक्षार्थींसाठी लागू राहतील, इतर उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक राहतील.

 • आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.

 • अ.ज./अ.जा. उमेदवार/अर्जदार वगळून इतरांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत (Non Creamylayer) प्रमाणपत्र

 • EWS उमेदवारांना (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र

Talathi Question Paper | तलाठी प्रश्नपत्रिका 

आपल्याकडे मागील काही वर्षांमध्ये झालेल्या तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. 

FAQ:

दिलेल्या तक्त्यामध्ये जिल्हा प्रश्नपत्रिकेसमोर डाउनलोड लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.

कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अर्हता प्राप्त केलेली असावी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे.
मराठी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक.

उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सूट असते.

तलाठी भरती परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा प्रकारे तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते. यामध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), सामान्य ज्ञान विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) व गणित व बुद्धिमत्ता विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) विचारले जातात.
या परीक्षेसाठी एकूण दोन तासांचा वेळ असतो.

3 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us