Solutions and Ionization | द्रावणे व आयनीभवन

द्रावण (Solutions): दोन किंवा अधिक पदार्थाचे समांग मिश्रण म्हणजे द्रावण. हे तिन्ही अवस्थेत सापडतात.

Types of Solutions in Marathi |द्रावणांचे प्रकार

 1. द्रवामध्ये स्थायू – साखरेचे पाणी
 2. द्रवामध्ये वायू – CO2 चे पाण्यातील द्रावण, पिण्याचा सोडा.
 3. वायूमध्ये वायू
 4. द्रवामध्ये द्रव
 5. स्थायूमध्ये स्थायू
 6. वायूमध्ये स्थायू – कापूर, डांबरगोळी यांचे संप्लवन होऊन तयार होणारे द्रावण.

द्रावणाची संहती:

प्रमाणित द्रावण : द्रावणाची संहती माहीत असल्यास प्रमाणित द्रावण म्हणतात.

संहती व्यक्त करण्याच्या पद्धती:

 1. शेकडा वजनी प्रमाण
 2. ग्रॅम रेणुता: पदार्थाचा ग्रॅममध्ये व्यक्त केलेला रेणुभार
 3. प्रसामान्यता: 1 लीटर द्रावणात किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळलेले आहे. हे दर्शविणारी संख्या म्हणजे प्रसामान्यता. प्रसामान्यता ‘N’ या संज्ञेने दर्शवितात.
 4. प्रसामान्य द्रावण : 1 ली. द्रावणात 1 gm सममूल्यभार द्राव्य विरघळलेले असल्यास त्यास प्रसामान्य द्रावण म्हणतात.

Electrolytic and Non Electrolytic Solutions | विद्युत अपघटनी आणि अनपघटनी द्रावणे

विद्युत अपघटनी: ज्या पदार्थाच्या पाण्यातील द्रावणातून विद्युतधारा वाहते त्यांना विद्युत अपघटनी द्रावणे म्हणतात नाहीतर विद्युत अनपघटनी द्रावणे म्हणतात.

आम्ले, आम्लारी, क्षार, NaCL, NaOH, KOH विद्युत अपघटनी द्रावणे आहेत.

साखर, युरिया, ग्लिसरीन,ओल्कोहोल ही सर्व सहसंयुज संयुगे आहेत त्यामुळे त्यांचे आयन तयार होत नाहीत व विद्युतधारा वाहत नाही.

परंतु HCL आणि अमोनिया (NH3) ही सहसंयुज संयुगे असूनही पाण्यात विरघळल्यावर विद्युत अपघटनीसारखी वागतात.

HCL द्रव – अपघटनी

HCL + पाणी = अपघटनी

Arrhenius Theory of Acid and Base | अर्हेनियसचा आयनीभवनाचा सिद्धांत (1887)

स्वीडिश संशोधक

‘काही संयुगे पाण्यात विरघळताच त्यांचे धनभारीत आणि ऋणभारीत आयनांत विभाजन होते. हे आयन स्वतंत्रपणे वावरतात आणि त्यांचे गुणधर्म अणूंच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात ही प्रक्रिया उलट सुलट असते.

HCl = H+ + Cl

अर्हेनियसने खालील संज्ञा मांडल्या

कॅटायन : धनप्रभारीत आयन

अॅनायन : ऋणप्रभारीत आयन

विद्युतधारेच्या प्रभावामुळे विरूद्ध विद्युतभार असणार्‍या इलेक्ट्रोडकडे आयन जातात.

द्रावणांची विद्युतवाहकता त्यामध्ये असणार्‍या आयनांच्या संख्येवर अवलंबून असते.

आयनीभवनविचरण आणि विचारणाचे परिणाम

आयनीभवन: मुळात आयनांच्या स्थितीत नसलेल्या रेणूंपासून आयन तयार होण्याची क्रिया म्हणजे आयनीभवन.

विचरण: विद्युत अपघटनीतील आयन विलग होण्याची क्रिया म्हणजे विचरण होय.

विचारणाचे परिणाम: विचरण होणार्‍या रेणूंची संख्या आणि द्रावणातील एकूण रेणूंची संख्या यांचे गुणोत्तर म्हणजे विचारणाचे परिणाम होय.

विचारणाचे प्रमाण, द्रावणाची विरलता, द्रावणाचे तापमान, द्रावणाचे स्वरूप व द्राव्याचे स्वरूप या चार गोष्टींवर अवलंबून असते.

आम्ल व आम्लारी अर्हेनियसच्या सिद्धांतानुसार

आम्ल: आम्ल म्हणजे पाण्यात विरघळल्यानंतर केवळ H+ आयन देणारे संयुग होय.

अल्क (Base): पाण्यात विरघळल्यानंतर केवळ OH- आयन देणारे संयुग होय.

तीव्र आम्ले: पाण्यात जास्त प्रमाणात विचरण आणि अधिक H+ आयन देणारे संयुग.

संहत आम्ले: आम्लाच्या द्रावणात आम्लाचे प्रमाण जास्त आणि पाणी कमी असते, तेंव्हा ते संहत आम्ल असते.

विरल आम्ल: आम्लाच्या द्रावणात आम्लाचे प्रमाण कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास ते विरल आम्ल असते.

दर्शक

अनुमापणात अंत्यबिंदू ठरविण्यासाठी उपयोगात येणारे पदार्थ म्हणजे दर्शक.

द्रावणातील हयड्रोक्झिल (H+) आयनांच्या संहतीनुसार दर्शकाचा रंग बदलतो.

फिनॉप्थालीन, मिथील ऑरेंज, तांबडा लिटमस, निळा लिटमस, हळद हे प्रमुख दर्शक आहेत.

लिटमस पेपर लायकेन या वनस्पतीपासून मिळवतात.

तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी = मिथील ऑरेंज किंवा फिनॉप्थालीन

सौम्य आम्ल, तीव्र आम्लारी = फिनॉप्थालीन

तीव्र आम्ल, सौम्य आम्लारी = मिथील ऑरेंज

दर्शक आम्लातील रंग आम्लारीतील रंग
फिनॉप्थालीन रंगहीन गुलाबी
मिथील ऑरेंज तांबडा निळा/पिवळा
हळद पिवळा तांबडा
निळा लिटमस तांबडा निळा
तांबडा लिटमस तांबडा निळा

Neutralization Process in Marathi | उदासीनिकरण प्रक्रिया:

या प्रक्रियेत आम्लातील H+ आणि अल्कलीतील OH- यांचा संयोग होऊन आयनीभावन न झालेले पाण्याचे रेणू तयार होतात.

उदासीनिकरण NaVa (a-आम्ल) = NbVb (b-आम्लारी)

उदासीनिकरणाच्या अभिक्रियेत तयार होणारा क्षार उदासीन असतोच असे नाही.

सामू (PH Indicator): P म्हणजे पोटेंझ (Potenz-संहती)

शुद्ध पाण्याचा सामू 7 असतो.

सामू (PH) – द्रावणाचे स्वरूप

7 – उदासीन

0-7 – आम्लधर्मी

7-14 अल्कधर्मी

PH of Various Substances | विविध पदार्थांचा PH:

 1. मानवी रक्त = 7.35 ते 7.45
 2. लाळ = 6.5 ते 7.5
 3. आम्लवर्षा = 5.6
 4. वीर्य = 7.5 ते 8
 5. जठर रस = 2
 6. माती = 7.2
 7. पावसाचे पाणी = 7
 8. Urine = 6
 9. Bear = 4 to 5
 10.  मीठ = 7
 11.  समुद्राचे पाणी = 8.5
 12.  Cofee = 4.5 ते 5.5
 13.  दूध = 6.4 ते 6.6
 14.  टोमॅटो = 4.0 ते 4.4
 15.  लिंबू = 2.2 ते 2.4
Tags:

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us