Modern History of India Part I | आधुनिक भारताचा इतिहास
This Article Contains
Toggleइ. स. 14 व्या शतकातील काळ हा युरोपमधील ‘अराजकतेचा कालखंड’ किंवा ‘तमोयुग’ किंवा ‘अंध:कारयुग’ म्हणून ओळखला जातो. 1453 मध्ये तुर्कस्थानने कॉन्स्टाटिनोपल हे शहर जिंकून घेतले. भारत-युरोप यांच्यामधील ‘इराणचे आखात – कॉन्स्टाटिनोपल – इटली’ हा खुश्कीचा व्यापारी मार्ग बंद झाला. यामुळे भारताकडे जाणार्या नव्या व्यापारी मार्गाचा शोध लावणे युरोपीयांना क्रमप्राप्त झाले. यातूनच कोलंबस ने अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध लावला (1492). वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कलीकत बंदरात प्रवेश केला आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपीयन ठरला.
प्रारंभी राज्यविस्तारावर भर देताना पोर्तुगीजांनी आदिलशाहकडून जिंकून घेतलेले गोवा (1510) हे आपले मुख्य केंद्र बनवले.
ईस्ट इंडिया कंपनी: लंडनमधील व्यापारी गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी स्थापना.
इंग्रज-फ्रेंच संघर्ष ( तीन कर्नाटक युद्धे)
1650 साली स्पेनने पोर्तुगालचा व 1654 मध्ये इंग्लंडने हॉलंडचा (डच चा) पराभव केला.
पहिले कर्नाटक युद्ध (1746-48):
मद्रास हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र तर पोंडीचेरी येथे फ्रेंच सत्ता.
युद्ध होऊन फ्रेंचांनी मद्रास जिंकले व तहानंतर परत केले.
दुसरे कर्नाटक युद्ध (1748-54):
या काळात हैदराबाद व अर्कट (कर्नाटक) येथील नावाबांच्या भांडणात फ्रेंचांनी हस्तक्षेप केला. मात्र इंग्रजांनी त्यांच्या गव्हर्नर सांडर्स व क्लाइव्ह यांच्या जोरावर अर्कातफ्रेंचाकडून जिंकून घेतले.
तिसरे कर्नाटक युद्ध 1760- वांदीवॉशची लढाई:
1756 च्या युरोपातील इंग्लंड – फ्रांस युद्धाचे पडसाद भारतात.
भारतात झालेल्या 22 जाने 1760 च्या वांदीवॉशच्या लढाईत इंग्रजांनी फ्रेचांना पराभूत केले. 1763 च्या पॅरिस तहानुसार पददूचेरी परत केला व आपले लक्ष बंगालकडे वळवले.
इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व: (प्लासीची लढाई व बक्सारची लढाई)
बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान यांच्या मृत्यूनंतर (1756) पुत्र सिराजउद्दौला याने इंग्रजांवर स्वारी करून कासिमबाजार व कोलकाता या वखारी ताब्यात घेतल्या.
प्लासीची लढाई (23 जून 1757):
- मीरजाफरशी संधान करून सिराजचा पराभव. (सिराजचा सेनापती मीरजाफर).
- 1780 मध्ये इंग्रजांनी मीरजाफरचा जावई मीरकासीम यास सत्तेवर आणले.
- 1763 ला पुन्हा मीरजाफरला नावाबपदी आणले.
बक्सारची लढाई:
(22 ऑक्टोबर 1764) इंग्रज विरूद्ध शहा आलम, शुजाऊद्दौला (अवध चा नवाब), मीरकासीम संघर्ष
रॉबर्ट क्लाइव्ह व त्याची दुहेरी राज्यव्यवस्था (1757-1760)
क्लाइव्ह नंतर आलेले व्होल्स्टर (1767-69) आणि कार्टीयर (1769-72)
व्होलस्टरने क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली (1772)
हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल (1773)
1775-82: पहिले मराठा-इंग्रज युद्ध
साल्हबाईचा तह (1782) :
यानुसार मराठ्यांना ठाणे व साष्टी ही ठिकाणे मिळाली.
पहिले म्हैसूर युद्ध:
इंग्रज विरूद्ध हैदरअली (1766-69)
दुसरे म्हैसूर युद्ध:
इंग्रज, हैदर विरूद्ध टिपू सुलतान
गव्हर्नर व त्यांची कामे
लॉर्ड कर्नव्हालीस (1786-1793) (दुसर्यांदा 1805 ला)
कायमधारा पद्धतीचा स्वीकार
लॉर्ड वेलस्ली (1798-1805)
ताईनाती फौजेचा स्वीकार
इंग्रज-मराठा दुसरे युद्ध (1802-04)
वसई चा तह (31 डिसेंबर 1802): मराठा साम्राज्याचा अंत
लॉर्ड हेस्टिंग्ज (मार्कवेस ऑफ हेस्टिंग्ज 1813-1823)
इंग्रज-नेपाळ युद्ध 1810
तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध (1817-18)
लॉर्ड विल्यम बेंटिक (1828-1835)
सती प्रतिबंधक कायदा (1829)
लॉर्ड हर्डिंग्ज पहिला(1844-48)
रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू
लॉर्ड डलहौसी (1848-1856) संस्थाने खालसा धोरण
शीखांचा पराभव करून डलहौसीने पंजाब खालसा केले.
बंकीमचंद्र चाटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत संन्याशांच्या बंडाचे वर्णन आढळते.
वेल्लोरचे बंड: भारतीय सैनिकांनी 1806 मध्ये मद्रास प्रांतातील (वेल्लोर) येथे मोठा उठाव झाला. इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होय.
उत्तर भारतातील उठाव
31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती. मात्र त्याआधीच 29 मार्च बाराकपूर येथील छावणीत मंगल पांडे या शिपायाने मेजर हयुसन या ब्रिटिश अधिकार्यावर गोळी झाडली.
8 एप्रिल 1857 मंगल पांडे यांस फाशी देण्यात आली.
दिल्लीतील उठाव:
नेतृत्व: बहादुरशाह जफर दूसरा व त्याचा सेनापती बख्तखान
11 मे 1857 ला क्रांतिकारकांनी बहादूरशाह दूसरा यास बादशाह घोषित केले आणि 24 तासांत दिल्ली काबीज केली.
कानपूर येथील उठाव:
नेतृत्व: नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्यासाहेब टोपे
कानपूर मध्ये बिठुर (ब्रम्हवर्त) हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते.
18 एप्रिल 1859 तात्या टोपेंना क्षिप्री (शिवपुरी) येथे फाशी.
लखनौ येथील उठाव: 30 मे 1857
नेतृत्व: अवधच्या बेगम हजरत महल (मुलगा कादीर) यास गादीवर बसवले.
झाशी येथील उठाव: 5 जून 1857
नेतृत्व: राणी लक्ष्मीबाई उर्फ मनूकर्णिका
‘Ablest of the Rebel Leaders’ (बंडवाल्यांचे सर्वात समर्थ नेतृत्व) – सर हयू रोज
1857 च्या स्वातंत्र्यसमरातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाला –स्वातंत्र्यवीर सावरकर
जगदीशपुर (बिहार) येथील उठाव:
20 जुलै 1857 बिहारमधील ‘आरा’ येथील तुरुंगातील कैद्यांना मोकळे करून बंडास सुरुवात झाली.
नेतृत्व: जगदीशपूरचा 80 वर्षाचा वृद्ध जमीनदार राणा कुंवरसिंह याने दानापुर (बिहार) छावणीतील हिन्दी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले.
सेनापती डग्लसने केलेल्या हल्यात कुंवरसिंह मृत्यू पावला. (9 मे 1858)
खानदेशात खर्जासिंग (काजीसिंग) भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पंधराशेवर अधिक भिल्लानी बंड केले.
सातपुडा भागात शंकरशाहच्या नेतृत्वाखाली उठावाचा प्रयत्न झाला.
1857 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीच्या राजवटीची भारतातील अखेर.
1 नोव्हेंबर 1858: अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पहिला जाईल असे घोषित केले.
लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय व लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारतमंत्री बनला.
स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत:
- स्वातंत्र्यवीर सावरकर: हिन्दी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले क्रांतियुद्ध
- अशोक मेहता
- संतोषकुमार रे.
- कर्नल माल्सन
- डॉ. सुरेन्द्रनाथ सेन
फ्रान्समध्ये 1857 च्या उठावाचे ‘gods judgement upon english rule in india’ असे केले आहे.
शिपायांचे बंड मानणारे नेते:
- प्रा. न. र. फाटक: 1857 चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी
- सर जॉन लौरेन्स: बंडाचे मूळ कारण केवळ काडतुस प्रकरण होय बाकी काही नाही.
- सर जॉन सीले
- पी. ई. रॉबर्ट्स
- किशोरचंद्र मित्रा: ‘लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा आजिबात संबंध नाही.’
- डॉ. आर. सी. मुजूमदार
1857 नंतरचे व्हाईसरॉय
1 लॉर्ड कॅनिंग:
1856-58: या काळात गव्हर्नर जनरल.
1858-62: या काळात व्हाईसरॉय
भारताचा पहिला व्हाईसरॉय
2 लॉर्ड एल्गिन पहिला (1862-63)
3 सर जॉन लॉरेन्स (1864-69)
4 लॉर्ड मेयो (1869-1872)
1872 मध्ये भारताची पहिली जनगणना
5 लॉर्ड नॉर्थब्रूक (1772-76)
6 लॉर्ड लिटन (1776-80)
1 जाने 1877 – दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास ‘भारताची साम्राज्ञी’ ‘कैसर-ए-हिन्द’ पदवी दिली.
7 लॉर्ड रिपन (1780-84)
रामचंद्र मित्तर यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
8 लॉर्ड डफरीन (1884-88)
28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची स्थापना
9 लॉर्ड लान्सडाउन (1888-94)
भारत – अफगाणिस्तान दरम्यान ड्यूरांड सीमारेषा
10 लॉर्ड एल्गिन दूसरा (1894-99)
या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ आली.
11 लॉर्ड कर्झन (1899-1905)
सर्वाधिक रेल्वेमार्गाची लांबी
1901- राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘कोलकाता मेमोरियल हॉल’ स्मारक उभारले.
- 19 जुलै 1905 – बंगालच्या अन्याय फाळणीची
- फाळणीची मूळ कल्पना- सर विल्यम वॉर्ड (1896)
- फाळणीस विरोध: सर हेनरी कॉटन (1896)
- 16 ऑक्टोबर 1905 – बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा
1773 च्या रेगुलेटिंग अॅक्टनुसार कोलकाता येथे सूप्रीम कोर्टाची स्थापना प्रिव्ही कौन्सिलची न्याय समिती (Judicial committe of privy Council)
स्थापना – 1833 (इंग्लंड)
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते अपीलाचे सर्वोच्च न्यायालय होते. हायकोर्टाची स्थापना (उच्च न्यायालये) 1861 च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिली व प्रांतातील सर्वोच्च न्यायालये स्थापन करण्यात आली. (1862 ला)
इंग्रजांचे दुष्काळविषयक धोरण
- कर्नल स्मिथ आयोग – वायव्य सरहद्द प्रांतातील दुष्काळातील चौकशी करण्यासाठी
- कॅम्पबेल आयोग – ओरिसा प्रांतातील दुष्काळाची चौकशी
- सर ल्योल आयोग – वायव्य प्रांत, औंध, बिहार, पंजाब, मुंबई येथील दुष्काळ चौकशी (1876-78)
- सर माक्डोंनल आयोग – 1899-1900 चा दुष्काळ
1817 साली कोलकात्यास हिंदू कॉलेज स्थापन केले. (राजा राममोहन रॉय यांचे विशेष प्रयत्न)
जेम्स हिकी या इंग्रज गृहस्थाने 1780 साली ‘The Bengol Gazet’ हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले.
चार्ल्स मेटकाल्फ (1835) याने वृत्तपत्रांवरील सर्व निर्बंध रद्द केल्याने त्याला मुद्रणस्वातंत्र्याचा उद्गाता असे म्हणतात.