दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 अपडेट

Civil Judge Junior division and Judicial Magistrate First Class Main Examination 2021-Retotalling of Marks-Phase 1

जा.क्र.48/2022 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 चे गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 02 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) (मुख्य) परीक्षा-2021 लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 01 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सदर निकालाद्वारे मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही लिंक दिनांक 10 नोव्हेंबर 2022 दिनांक 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत येत आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us