पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022
This Article Contains
Toggleपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 सर्व अपडेट्स
या पेजवर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 च्या भरतीविषयीचे सर्व अपडेट्स मिळतील.
PCMC Bharti 2022 Latest Update : 14/09/2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करणेबाबत जाहीर निवेदन | PCMC Recruitment 2023 Document Verification on 30/09/2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 27/05/2023, 28/05/2023 व दिनांक 17/07/2023 रोजी घेण्यात आली. उत्तरतालिका प्रसिद्ध करून 03 दिवसांच्या मुदतीत उमेदवारांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकतींवर अंतिम निर्णय झाला आहे. उमेदवारांनी घेतलेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर वरील पदांच्या ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय निकाल मनपा संकेतस्थळावर दिनांक 30/08/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार कारणेपूर्वी, ऑनलाईन फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता उमेदवारांना 1:3 प्रमाणात बोलावण्यात येत आहे. उमेदवारांची यादी कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकासह प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी ऑटो क्लस्टर, मिटिंग हॉल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी पुणे 411019 येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या उमेदवारांची यादी, दिनांक, कागदपत्रांची यादी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या उमेदवारांची यादी, दिनांक, कागदपत्रांची यादी
लिपिक पदाच्या ऑनलाईन उमेदवारांची यादी, दिनांक, कागदपत्रांची यादी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या उमेदवारांची यादी, दिनांक, कागदपत्रांची यादी
PCMC Bharti 2022 Latest Update : 30/08/2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर | PCMC Result Declared
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 27/05/2023, 28/05/2023 व दिनांक 17/07/2023 रोजी घेण्यात आली. उत्तरतालिका प्रसिद्ध करून 03 दिवसांच्या मुदतीत उमेदवारांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकतींवर अंतिम निर्णय झाला आहे.
दिनांक 27/05/2023, 28/05/2023 व दिनांक 17/07/2023 रोजी लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांची एकापेक्षा जास्त सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. Normalization करून गुण प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल
लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल
PCMC Bharti 2022 Latest Update : 17/08/2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती कागदपत्र पडताळणी बाबत जाहीर निवेदन | PCMC Recruitment 2023 Document Verification
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशामन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक(वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायजर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरीक्षक या पदांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार वरील पदांच्या ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.
उमेदवारांनी दिनांक 25/08/2023 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी ऑटो क्लस्टर, मिटिंग हॉल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी पुणे 411 019 येथे सकाळी 10:00 वाजता उपस्थित राहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करिता येताना परिशिष्ठ ‘ब‘ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीचा एक संच बरोबर आणावा. एकापेक्षा अधिक पदाकरिता उमेदवारास कागदपत्रे पडताळणीकरिता बोलाविले असता त्याप्रमाणात कागदपत्रांचा साक्षांकित प्रतीचा संच सोबत आणावा. कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती या सक्षम अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या असाव्यात. वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांनी महिला आरक्षण निवडलेले आहे. त्या उमेदवारांच्या महिला आरक्षणाबाबत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
अधिकृत सूचना, उमेदवारांची यादी व परिशिष्ट ‘ब‘ पाहण्यासाठी PDF वाचा.
अधिकृत सूचना पहा.
PCMC Bharti 2022 Latest Update : 10/08/2023
पिंपरी चिंचवड भरती निकाल जाहीर | PCMC Bharti Result Declared
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशामन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक(वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायजर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरीक्षक या पदांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार वरील पदांच्या ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वरील नमूद पदांच्या नेमणुका करणेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेप्रमाणे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणेकरीता वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
निकाल यादी पहा
अधिकृत वेबसाईट
PCMC Bharti 2022 Latest Update : 22/07/2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती उत्तरतालिका उपलब्ध | PCMC Bharti Answer Key Available
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 26/05/2023 ते 28/05/2023 या कालावधीत घेण्यात आली होती. तथापि 28/05/2023 रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा असल्याने काही उमेदवारांना काही पदांची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 17/07/2023 रोजी घेण्यात आली होती.
लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या चार पदांच्या उत्तरतालिकेची लिंक 21/07/2023 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती असल्यास 24/07/2023 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात. प्रत्येक हरकतीस 200 रुपयांचे शुल्क असेल.
नोटीस PDF लिंक
उत्तरपत्रिका पाहण्याची लिंक
Update 07-07-2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रवेशपत्र उपलब्ध | PCMC Exam Hallticket
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती.
दिनांक 28 मे 2023 रोजी UPSC पूर्व परीक्षा असल्यामुळे फक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशामन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक(वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायजर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरीक्षक याच पदांची परीक्षा घेण्यात आली.
लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता. स्थापत्य, व कनिष्ठ अभियंता. विद्युत या पदांसाठी दिनांक 17 जुलै 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता प्रवेशपत्र संकेतस्थळावर दिनांक 07 जुलै 2023 पासून उपलब्ध होईल.
Update 05-07-2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती उत्तरतालिका उपलब्ध | PCMC Exam Answer Key
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-ब व गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती.
दिनांक 28 मे 2023 रोजी UPSC पूर्व परीक्षा असल्यामुळे फक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशामन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक(वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायजर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरीक्षक याच पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या उत्तरतालिकेची लिंक संकेतस्थळावर 5 जुलै 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तरपत्रिकेत काही आक्षेप असल्यास दिनांक 7 जुलै 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत पाठवण्यात यावे. प्रत्येक हरकत नोंदवण्यासाठी 200 रुपये शुल्क असेल.
Update
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 परीक्षा प्रवेशपत्र | PCMC Exam 2022 Hall ticket Download
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शैक्षणिक व इतर अर्हता पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर 12/05/2023 पासून उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवार अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक | PCMC Exam Schedule
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शैक्षणिक व इतर अर्हता पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी दिनांक 26/05/2023, दिनांक 27/05/2023 व दिनांक 28/05/2023 रोजी तीन शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता ऑनलाईन परीक्षेची शिफ्ट व वेळ खालील pdf मध्ये दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम | PCMC Exam 2022 Syllabus
खालील pdf मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीमधील सर्व पदांचा अभ्यासक्रम दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 मधील पदांच्या जागा व आरक्षण याबाबत अपडेट | PCMC Exam 2022 Posts and Reservation
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शैक्षणिक व इतर अर्हता पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सविस्तर जाहिरातीमधील 12.20 नुसार तसेच मागासवर्ग कक्ष पुणे यांचेकडून जाहिरातीमधील पदांचे रोस्टर तपासणीअंती काही पदांचे रिक्त जागांमध्ये व आरक्षणामध्ये बदल झालेले आहेत. खाली दिलेली pdf पहा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 | PSMC Exam 2022 Recruitment (जाहिरात क्रमांक. 184/2022)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शैक्षणिक व इतर अर्हता पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सर्व पदांची नावे, अर्हता, वयोमर्यादा इत्यादी बाबी जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात PDF पहा.