महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अपडेट | Maharashtra Police Bharti Latest Update
This Article Contains
Toggleपोलीस भरती 2022 संपूर्ण माहिती PDF
पोलीस भरती 2022 शारीरिक चाचणी गुणांची विभागणी PDF
पोलीस शिपाई चालक भरती 2021 (लातूर) (05 Nov 2022)
एकूण जागा – 29
अर्ज सुरू दिनांक – 9 नोव्हेंबर 2022
शेवटची दिनांक – 30 नोव्हेंबर 2022
पुणे लोहमार्ग 124 जागा साठी भरती
मुंबई पोलीस आयुक्त भरती प्रक्रिया सोडून इतर सर्व जिल्ह्याच्या लेखी परीक्षा एकाच दिवशी असेल. सन 2021 पोलीस शिपाई भरतीच्या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती दिनांक 09/11/2022 रोजी www.mahapolice.gov.in व policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवर प्रसारित करण्यात येणार आहे.
SRPF पोलीस भरती प्रक्रिया 9 नोव्हेंबर पासून सुरू होईल. (05 Nov 2022)
पोलीस भरती नवीन अपडेट- पोलीस भरती2022 कमाल वयोमार्यादा वाढ | Police Bharti Latest Update (04 Nov 2022)
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवारांना एक संधी मिळणार आहे.
कोविड 19 साथरोगामुळे 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार, निवडीद्वारे या पदांसाठी सन 2020 व 2021 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी, एक वेळची उपाययोजना म्हणून, पात्र असतील.
पोलिस शिपाई पदांची भरती स्थगित (29 Oct 2022)
पोलिस शिपाई पदांची जाहिरात प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नवीन तारखा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती 2022 बद्दल खूप आनंदाची बातमी मिळत आहे. एकूण 17130 पदांची पोलीस भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई यांची 14156 पदांसाठी तर पोलीस शिपाई चालक यांची 2174 पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात 1 डिसेंबर ला प्रसिद्ध होईल. या पदांसाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 03-11-2022 ते 31-11-2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील.
भरती प्रक्रिया कशी होईल? Process of Maharashtra Police Bharti 2022
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
- भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून रिक्त पदाच्या एकास दहा (1:10) प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. - पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, प्रमाणपत्रे, आरक्षणाबद्दल माहिती,परीक्षा शुल्क, अर्ज सादर करण्याचा दिनांक, वेळ याबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी PDF पहा.
पोलीस भरती अधिकृत वेबसाईट
पोलीस भरती जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
पोलीस भरती ऑनलाईन सराव परीक्षा सोडवा
सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.