पदार्थाच्या अवस्था | State of Matters

पदार्थाच्या अवस्था | State of Matters:

पदार्थाच्या अवस्था: स्थायू, द्रव, वायु

याखेरीज प्लाझ्मा व बोस आईनस्टाईन कंडेनसेट यादेखील पदार्थाच्या अवस्था आहेत.

  • स्थायू बहुदा असंपीडय असतात (सहज दाबले जाऊ शकत नाहीत.)
  • द्रव पदार्थ कमी असंपीडय असतात.
  • वायु पदार्थ सहज संपीडय असतात.

वायूंचे अणू-रेणू उर्जाभारीत असतात.

अवस्थांतर:

स्थायुला उष्णता दिल्यास रेणूंची गतीज ऊर्जा वाढून आकर्षण कमी होते व रेणुसंरचना विस्कळीत होऊन द्रवीभवन होते.

अवस्थांचे प्रकार:

  • सांद्रन: द्रवाचे स्थायुत रूपांतर
  • द्रवीकरण: स्थायूचे द्रवात रूपांतर
  • बाष्पीभवन: द्रवाचे वाफेत रूपांतर
  • संघनन: वाफेचे द्रवात रूपांतर
  • संप्लवन: स्थायूचे थेट वायुत रूपांतर

सर्व स्थयूंचा द्रवनांक स्थीर असतो. (काच, मेण इत्यादि आस्फाटिकी पदार्थ वगळून)

द्रवातील विद्राव्य क्षारांमुळे त्याचा द्रवनांक कमी होतो.

कोणत्याही पदार्थाचा द्रवनांक व गोठणांक समान असतो.

गोठण मिश्रणे | Freezing Mixtures:

बर्फावर विद्राव्य पदार्थ टाकल्यास त्या मिश्रणाचे तापमान 00 C पेक्षा खाली उतरते त्यांना गोठण मिश्रणे म्हणतात.

  • बर्फ आणि मीठ = -23 C
  • कॅल्शियम क्लोराईड + बर्फ = -55 C
  • अमोनियम नायट्रेट + सोडीयम सल्फेत = -10 C
  • कोरडा कार्बनडायऑक्साइड आणि इथर = -77 C

मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे आणि द्रावणे

आज ज्ञात असलेल्या सुमारे 119 मूलद्रव्यांपैकी 92 निसर्गात आढळतात.

द्रावणे (Solutions): दोन किंवा अधिक पदार्थांचे समांगी मिश्रण म्हणजे द्रावण.

उदा. सोडा वॉटर

निलंबन (Suspension): दोन किंवा अधिक पदार्थाचे विषमांगी मिश्रण, यात द्रव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात.

कलील: हे विषमांगी मिश्रण असून यातील कण निलंबन कणापेक्षा लहान असतात व द्रावणात एकसारखे असतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us