Some Important Bases
October 15, 2020
This Article Contains
Toggleक्षार: जेंव्हा आम्ल सव आम्लारीचे उदासिनीकरण होते, तेव्हा क्षार तयार होतात.
NaOH (आम्लारी) + HCL (आम्ल) = NaCl (क्षार) + H2O (पाणी)
1.Sodium Chloride (NaCL) | साधे मीठ:
तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या अभिक्रियेतून तयार होते.
सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट या क्षारांच्या निर्मितीत तसेच सोडियम हायड्रॉक्साइड या संयुगांच्या निर्मितीसाठी NaCL वापरतात.
2. Sodium Bicarbonate (NaHCO3) | बेकिंग सोडा / खाण्याचा सोडा:
- रासायनिक नाव: सोडियम हायड्रोजन कार्बोनेट (आम्लारिधर्मी)
- याचा उपयोग सच्छिद्र व हलका पाव, केक, ढोकळा बनवण्यासाठी करतात.
- आग्निशामन यंत्रातील घटक असलेला (CO2) बनवण्यासाठी वापरतात.
- आम्लारिधर्मी असल्यामुळे पोटातील आम्लपित्त कमी करण्यासाठी वापरतात.
3. Sodium Carbonate (Na2CO3) | धुण्याचा सोडा (आम्लारिधर्मी):
- सोडियम बायकार्बोनेटच्या अपघटनातून सोडियम कार्बोनेट तयार होते.
- पेट्रोलियम शुद्धीकरण, अपमार्जके, कागद व काच उद्योगात उपयोग.
- कॅल्शियम व मॅग्नीशियम या धातूंच्या क्लोराईड्स व सल्फेट्सच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते, हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा वापर करतात.
4. Bleaching Powder (CaOCL2) | विरंजक चूर्ण:
- विरंजक चूर्ण ही पांढर्या रंगाची भुकटी असते.
- निर्मिती: विरी गेलेल्या चुन्याची क्लोरीनबरोबर अभिक्रिया होऊन विरंजक चूर्ण (ब्लीचिंग पाऊडर) तयार होते.
- Ca(OH)2 + Cl2 = CaOCl2 + H2O
- विरंजक चुर्णास क्लोराईड ऑफ लाईम म्हणतात व मुक्त झालेल्या क्लोरीनला उपलब्ध क्लोरीन म्हणतात.
- उपयोग: विरंजक चुर्णाचा CO2 शी संपर्क होऊन कॅल्शियम कार्बोनेट व क्लोरीन वायु तयार होतो. विरंजक चुर्णातील हा मुक्त झालेला क्लोरीन वस्त्रोद्योगात कापसाचे, कागद उद्योगात कागदाच्या लगद्याचे कपड्याचे विरंजन करण्यासाठी वापरतात.
- क्लोरोफॉर्म या द्रावकाच्या निर्मितीसाठी विरंजक चूर्ण ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात. अस्वच्छ जमीन जंतुविरहित करण्यासाठी व पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चुर्णाचा वापर करतात.
इंग्रजी नाव | व्यावहारिक नाव | मराठी नाव | उपयोग |
फेरस सल्फेट | ग्रीन व्हिट्रीऑल | हिराकस | शाई व रंग उत्पादनासाठी |
मॅग्नीशियम सल्फेट | इप्सम सॉल्ट | औषधांमध्ये रेचक म्हणून, कापड उद्योगात रंगबंधक म्हणून. | |
कॉपर सल्फेट | ब्ल्यु व्हिट्रीऑल | मोरचूद | जंतुनाशक, कवकनाशक,तांबे शुद्धीकरणात डॅनियलच्या विद्युत घटात द्रावण म्हणून. |
पोटाशियम नायट्रेट | नायटर किंवा बेंगोल सॉल्ट पिटर | सोरा | बंदुकीची दारू, शोभेची दारू, खत उद्योगात |
मॅग्नीशियम कार्बोनेट | फ्रेंच चॉल्क | औषधात आम्ल प्रतिबंधक म्हणून सौंदर्य प्रसाधने, टुथपेस्टमध्ये | |
झिंक सल्फेट | व्हाइट व्हिट्रीऑल | डोळ्यात घालावयाचे औषध लिथोफोन हा पांढरा रंग निर्मिती | |
झिंक ऑक्साइड | झिंक सफेदा | पांढरा रंग निर्मिती, रबर उद्योग, मलम निर्मिती | |
सोडियम हायड्रॉक्साइड | कॉस्टिक सोडा | साबण, धुण्याचा सोडा, कागद उद्योगात पेट्रोलियम शुद्धीकरणात | |
पोटाशियम अॅल्युमिनियम सल्फेट | तुरटी | जलशुद्धीकरण, कातडी उद्योग, कागद उद्योग, रक्तस्त्राव रोखण्यासाठी पोटाश तुरटीचा उपयोग | |
सिल्व्हर नायट्रेट | लुनार कॉस्टिक | शाई, कलप निर्मिती, चांदीचे विद्युत विलेपन, थर्मासमधील विलेपन | |
मर्कुरस क्लोराईड (Hg2Cl2) | कॅलोमेल | औषधांमध्ये रेचक म्हणून विद्युत इलेक्ट्रोडमध्ये | |
मर्कुरिक क्लोराईड | जंतुनाशक, लाकडाचे वाळवीपासून संरक्षण | ||
अमोनियम क्लोराईड | साल अमोनियअॅक | लेक्लांशेच्या विद्युत घटात | |
अमोनियम नायट्रेट | गोठण मिश्रणात, खत उद्योगात | ||
अमोनियम कार्बोनेट | बेकिंग पाऊडर | कापड उद्योगात | |
सिल्व्हर बोमाइड | छायाचित्रण उद्योगात | ||
पोटाशियम परमॅग्नेट | जलशुद्धीकरणात जंतुनाशक | ||
फॉस्फरस पेंटॉक्साइड | निर्जलक म्हणून | ||
लेड मोनॉक्साइड | लिथार्ज | शेंदूर | काच व रंग उद्योगात |
पोटाशियम हायड्रॉक्साइड | कॉस्टिक पोटाश | खत उद्योगात | |
कॅल्शियम सल्फेट | जिप्सम | प्रयोगशाळेत |
- मिथेनलाच (CH4) मार्श गॅस असेही म्हणतात. याचा उपयोग ज्वलनासाठी होतो.
- कार्बोनिल क्लोराईडलाच फॉस्जिन (COCl2) असेही म्हणतात. याचा उपयोग युद्धांमध्ये विषारी वायु म्हणून होतो.
- सोडियम सिलिकेटलाच जलकाच असे म्हणतात. याचा उपयोग साबण उद्योगात भरणद्रव्य म्हणून होतो.
- फ्लिंट काचलाच प्रकाशिय काच असेही म्हणतात. प्रकाशिय उपकरणे, कृत्रिम हीरे बनवण्यासाठी होतो.
FAQ:
What is the formula of Sodium Chloride?
Formula of Sodiun Chloride is – NaCL
What is the formula of Sodium Bicarbonate?
The formula of Sodium Bicarbonate is – NaHCO3
What is the formula of Sodium Carbonate?
The formula of Sodium Carbonate is Na2CO3
What is the formula of Nleeching Powder?
The formula of Bleaching Powder is CaOCl2
Post Views: 1,843