महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सर्व अपडेट्स

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सर्व अपडेट्स

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – 938 जागा (अर्जाची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर)

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 938 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025, रविवार दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क भरती 2025 संपूर्ण माहिती

संस्था:

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

एकूण पदसंख्या:

938 जागा

भरती प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ:

https://mpsc.gov.in/home

 

पदांबद्दल सर्व माहिती

अ. क्र.

पदाचे नाव:

शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा

01

उद्योग निरीक्षक (09 जागा)

अ. सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकीमधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

ब. विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

अमागास किमान 19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय /अनाथ / आ. दु. घ. : 19 ते 43 वर्षे

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / दिव्यांग : 19 ते 45 वर्षे

02

तांत्रिक सहायक (04 जागा)

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

03

कर सहायक (73 जागा)

अमागास किमान 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय /अनाथ / आ. दु. घ. : 18 ते 43 वर्षे

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / दिव्यांग : 18 ते 45 वर्षे

04

लिपिक-टंकलेखक (852 जागा)

अमागास किमान 19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय /अनाथ / आ. दु. घ. : 19 ते 43 वर्षे

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / दिव्यांग : 19 ते 45 वर्षे

·         (पदवीका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

·         मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

निवड पद्धती

परीक्षेचे टप्पे:

·         संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा

·         संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण : 100

·         संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण : 400

 

महत्वाचे दिनांक

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

दिनांक 07.10.2025 ते 27.10.2025 रात्री 23.59 पर्यंत

अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी

दिनांक 07.10.2025 ते 27.10.2025 रात्री 23.59 पर्यंत

परीक्षेचा प्रस्तावित दिनांक

04 जानेवारी 2026

 

अर्ज फीस

 

संयुक्त पूर्व परीक्षा:

मुख्य परीक्षा:

अमागास प्रवर्ग:

रु. 394/-

रु. 544/-

मागास / अनाथ / आ. दु. घ. प्रवर्ग:

रु. 294/-

रु. 344/-

माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग):

रु. 44/-

रु. 44/-

 

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

 

महत्वाची सूचना:

˃ भरतीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा.

˃ अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

˃ अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.

˃ वेळेपूर्वी अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका.