[2022] सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त । Current Chief Election Commissioner of India
This Article Contains
Toggleभारतीय निवडणूक आयोग | Election Commission of India
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाच्या कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार असते. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर.१९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). त्याचबरोबर एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. सुशील चंद्रा हे २४ वे व सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
सुशील चंद्रा यांच्याविषयी | About Sushil Chandra
- सुशील चंद्रा हे १९८० च्या बॅचचे आयआरएस (IRS) अधिकारी आहेत.
- उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे.
- रुरकी विद्यापीठून त्यांनी शिक्षण घेतलं तसेच त्यांनी डेहराडूनच्या डीएव्ही कॉलेजमध्ये एलएलबीची पदवी घेतली.
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत होते. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित होते. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याआधी सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. आता सुशील चंद्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते सीबीडीटीचे (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे) अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेत निवडणूक आयोगाने यापूर्वी मणिपूर, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या.
भारताचे आतापर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त | Indias All Time Chief Commissioner of India
०१) सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
०२) कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
०३) एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
०४) महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
०५) टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७
०६) एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२
०७) राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
०८) आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
०९) श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
१०) टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
११) एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१
१२) जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
१३) टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
१४) ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६
१५) एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९
१६) नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०
१७) शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२
१८) वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५
१९) हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
२०)नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७
२१) अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते २२ जानेवारी २०१८
२२) ओमप्रकाश रावत ः २३ जानेवारी २०१८ ते १ डिसेंबर २०१८
२३ ) सुनील अरोरा : २ डिसेंबर २०१८ पासुन
२४) सुशील चंद्रा : १३ एप्रिल पासून
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाच्या कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते.
सुशील चंद्रा हे २४ वे व सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
सुशील चंद्रा हे २४ वे व सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
२३ वे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा होते.
भारताचे सर्वात पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन (२१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८) होते.