राज्य उत्पादन शुल्क भरती, पदे, पात्रता, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता चाचणी सर्व माहिती
This Article Contains
Toggleराज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
वरील पदांसाठी वेतनश्रेणी | Pay Scale of State Excise Department
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील भरण्यात येणाऱ्या पदांसाठी मिळणारी वेतनश्रेणी खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification for State Excise Department Exam
लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
- लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट
- मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
- लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट
- मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवान, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
- इयत्ता 7 वी उत्तीर्ण
- वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशी पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
शारीरिक पात्रता | Physical Qualification Required
जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा | Age Required
राज्य उत्पादन शुल्क भरती विविध पदांसाठी लागणारी वयोमर्यादा खालील तक्त्यात दर्शविली आहे.

परीक्षेचे टप्पे
जवान, राज्य उत्पादन शुल्क
या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते व त्यानंतर 80 गुणांची शारीरिक चाचणी/मैदानी परीक्षा घेण्यात येते.
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क
या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते, त्यानंतर 80 गुणांची शारीरिक चाचणी/मैदानी परीक्षा घेण्यात येते.
त्यानंतर हलके मोटार चालविणे व जाड मोटार वाहन चालविणे ही अर्हताकारी चाचणी घेण्यात येते.
चपराशी
या पदासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते.
लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुटंकलेखक
या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते व त्यानंतर 80 गुणांची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेण्यात येते
अभ्यासक्रम | Syllabus for State Excise Department
लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक व जवान,राज्य उत्पादन शुल्क पदासाठी अभ्यासक्रम
खालील तक्त्यामध्ये लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक व जवान,राज्य उत्पादन शुल्क पदासाठी असणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी अभ्यासक्रम
खालील तक्त्यामध्ये जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी असणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

चपराशी पदासाठी अभ्यासक्रम
खालील तक्त्यामध्ये चपराशी पदासाठी असणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

वरील विषयांमध्ये खालील घटकांचा समावेश असेल.
- बुद्धिमापन चाचणी : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
- सामान्य ज्ञान : महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी
- मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
- इंग्रजी : Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage
लेखी परीक्षेकरिता नकारात्मक गुणदान:
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 23% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.
लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल.
जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदांकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी | Physical Test for State Excise Department
जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येते.
शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीसाठी गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

मैदानी चाचणी 80 गुणांची असून त्यांचे गुण विभाजन मैदानी प्रकारानुसार खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
अ. पुरुष उमेदवारांसाठी
1) 1.5 किमी धावणे (30 गुण)

2) 100 मीटर धावणे (30 गुण)

3) गोळा फेक (गोळा वजन – 7.260 किग्रॅ.) (20 गुण)

ब. महिला उमेदवारांसाठी
1) 1.5 किमी धावणे (30 गुण)

2) 100 मीटर धावणे (30 गुण)

3) गोळा फेक (गोळा वजन – 7.260 किग्रॅ.) (20 गुण)

ही माहिती कामाची आहे असे वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.