वनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Exam All Details
This Article Contains
Toggleवनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Recruitment All Details
येथे खाली तुम्हाला वनरक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे.
वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification Required for Forest Guard Exam
- उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
वनरक्षक पदासाठी वेतनश्रेणी | Pay Scale for Forest Guard
रु. 21700 -69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते.
वनरक्षक पदासाठी वयोमर्यादा | Age Limit for Forest Guard Exam
- उमेदवार हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व 27 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
उच्च वयोमर्यादेत खालीलप्रमाणे शिथिलता देण्यात येईल.
- मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत
- माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील.
- पात्र खेळाडूच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत
- प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा 45 राहील.
- पदवीधर/पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
- रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता | Physical Requirement for Forest Guard Exam
- उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.
2. उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.
प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टियुक्त असणे आवश्यक आहे.
- नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येते.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररीत्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्याच्या मुलांना खालीलप्रमाणे सूट देण्यात येईल.
- i] उंची: पुरुष व स्त्री उमेदवारासाठी 2.5 सेमी
- ii] छाती: मोजणी आवश्यक नाही.
- खेळाडू प्रवर्ग: विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये 2.5 सेमी. इतकी सवलत देण्यात येते.
- वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शारीरिक अर्हतेमध्ये सवलत: सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारीरिक पात्रतेत खालीलप्रमाणे सवलत देण्यात येते.
- i] उंची: पुरुष आणि स्त्री उमेदवारास 2.5 सेमी
- ii] छाती: पुरुष उमेदवारांना 2.0 सेमी न फुगवता व 1.5 सेमी फुगवून
वनरक्षक भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम | Forest Guard Syllabus
पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येते. लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात.
लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (10 वी) पातळीची राहते.
लेखी परीक्षा ही 120 मिनिटांची (2 तासांची )असते. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. प्रत्येक प्रश्नास 2 गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरास 0 गुण कमी करण्यात येतील.
45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्याकरिता पात्र असतील. ज्या उमेदवारांना किमान 45% गुण मिळणार नाहीत ते उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी बाद ठरतील.
वनरक्षक भरती शारीरिक मोजमाप | Physical Measurement for Forest Guard
लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीद्वारे करण्यात येते.
वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतात.
वनरक्षक पदाच्या नियमानुसार किमान शारीरिक पात्रता धारण करतात किंवा नाही हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घेण्यात येतात. जे उमेदवार विहित शारीरिक पात्रता धारण करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतात.
वनरक्षक भरती धाव चाचणी | Running Test for Forest Guard
पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येते व महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येते. जे उमेदवार धाव चाचणी विहित वेळेत पूर्ण करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
पुरुष उमेदवार 5 किमी अंतर धावण्याची चाचणी
एकूण 80 गुणांसाठी धावण्याची चाचणी घेण्यात येते.
महिला उमेदवार 5 किमी अंतर धावण्याची चाचणी
एकूण 80 गुणांसाठी धावण्याची चाचणी घेण्यात येते.
- कागदपत्र तपासण्या, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचणी शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येते.
वनरक्षक सर्वसाधारण गुणवत्ता यादी | Forest Guard Merit List
लेखी परीक्षेत प्राप्त गुण व धाव चाचणीतील प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता यादी तयार करून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते.
लेखी परीक्षेत प्राप्त गुण व धाव चाचणीतील प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता यादी तयार करून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते.