महाराष्ट्र गट-क परीक्षा अभ्यासक्रम । MPSC Group-C Syllabus
This Article Contains
Toggleमहाराष्ट्र गट क सेवा परीक्षा एकूण दोन टप्यांत घेण्यात येते.
- पूर्व परीक्षा – 100 गुण
- मुख्य परीक्षा – 200 गुण
मुख्य परीक्षेत पेपर क्र.1 संयुक्त प्रकारचा व पेपर क्र.2 स्वतंत्र प्रकारचा असतो.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा । MPSC Group C Prelim Syllabus:
या परीक्षेत सामान्य क्षमता चाचणी विषयाची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा दर्जा बारावी असून ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची असते. या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ असतो.
महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम । MPSC Group C Preliminary Syllabus:
चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
अर्थव्यवस्था :
भारतातील अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित:
बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा | MPSC Group C Mains Examination Syllabus:
येथे उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय (Industries Inspector), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector), तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय (Technical Assistant, Directorate of Insurance), कर सहाय्यक (Tax Assistant), लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पदांच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दिला आहे.
मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा असतो तर पेपर 2 हा प्रत्येक पदासाठी वेगवेगळा असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात.
A. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (मुख्य) परीक्षा । Excise Sub Inspector Mains Exam:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (मुख्य) परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा व पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात.
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Excise Sub Inspector Mains Syllabus:
खाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुख्य परीक्षेचा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम दिला आहे.
The syllabus for Excise Sub Inspector (ESI) mains exam for paper 1 and paper 2 is given below.
पेपर क्र. 1
- मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
- इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. 2
- चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
- बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
- भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ-Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ-विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
- माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
- संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, दाता कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणार उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशदवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम – 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम-1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम-1989, हुंडाबंदी अधिनियम-1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
- The Bombay Prohibition Act, 1949
- The Maharashtra Excise Manual, Volume-I
- The Maharashtra Excise Manual, Volume-II
- The Maharashtra Excise Manual, Volume-III
B. कर सहाय्यक, मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Tax Assistant Mains Syllabus:
कर सहाय्यक मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा व पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात. खाली कर सहाय्यक मुख्य परीक्षेचा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम दिला आहे.
The syllabus for Tax Assistant mains examination is given below.
पेपर क्र. 1
1. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
2. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. 2
1. नागरिकशास्त्र – राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)
2. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ-Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ-विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
3. पंचवार्षिक योजना
4. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
5. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य:
बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
मूलभूत गणितीय कौशल्य- Basic Numeracy/Numerical Skill-numbers and their relations, orders of magnitude etc. (Class X level)
6. अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन,इत्यादी.
7. पुस्तपालन व लेखाकर्म (Book-Keeping & Accountancy) – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा,अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती.
Book-keeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations.
8. आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.
C. लिपिक-टंकलेखक, मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Clerk-Typist Mains Syllabus:
लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा व पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात. खाली कर सहाय्यक मुख्य परीक्षेचा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम दिला आहे.
The syllabus for Clerk-Typist mains examination is given below.
पेपर क्र. 1
1. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
2. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. 2
1. सामान्य ज्ञान – इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इत्यादी.
2. बुद्धिमापन विषयक प्रश्न – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
3. गणित – अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी.
4. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण.
5. चालू घडामोडी – भारतातील व महाराष्ट्रातील.
6. माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान
7. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती. (भारतातील व महाराष्ट्रातील)
8. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2005.
D. उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Industries Inspector Mains Syllabus:
उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा व पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात. खाली कर सहाय्यक मुख्य परीक्षेचा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम दिला आहे.
The syllabus for Industries Inspector mains examination is given below.
पेपर क्र. 1
- मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
- इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. 2
- चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
- बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
- भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ-Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ-विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
- माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
- संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, दाता कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणार उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
- अ) भारतातील औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, औद्योगिक समुह विकास (Cluster)
ब) उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने/कर कायदे, स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म, लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना.
क) राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य्य, भारतीय रिझर्व्ह बँक -लघु उद्योगांसाठीचे वित्तीय धोरण
- अ) उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी.
ब. औद्योगिक उपक्रम (माहिती व आकडेवारी गोळा करणे) नियम 1959.
क. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अधिनियम-2006 व औद्योगिक सुकतात परिषद नियम व कार्यप्रणाली.
- अ. आयात-निर्यात धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम.
ब. इंडियन पेटंट ऍक्ट 1911, इंडियन ट्रेंड अँड मर्चंट ऍक्ट 1958, फॅक्टरीज ऍक्ट 1948, बॉंबे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1958 व सुधारणा.
- आजारी लघु व मोठया उद्योगांचे पुनर्वसन धोरण, राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण (NCLT)
- महाराष्ट्र औद्योगिक विकास-महामंडळ (MIDC), SICOM, KVIB, KVIC, MPCB, MSSIDC, भांडार खरेदी धोरण.
E. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Technical Assistant Mains Syllabus:
तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा संयुक्त प्रकारचा व पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असतो. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही 100 गुणांचे पेपर असतात. खाली कर सहाय्यक मुख्य परीक्षेचा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम दिला आहे.
The syllabus for Technical Assistant mains examination is given below.
पेपर क्र. 1
1. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
2. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. 2
1. सामान्य ज्ञान – इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, इत्यादी.
2. बुद्धिमापन विषयक प्रश्न – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
3. मूलभूत गणितीय कौशल्य व सांख्यिकी कौशल्य – गुणाकार भागाकार, दशांश, टक्केवारी, सूट व व्याज
4. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
5. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, दाता कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणार उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
6. विमा विषयक ज्ञान – विमा विषयक संकल्पना व उत्क्रांती (The Concept of Insurance & its evolution)
विमा बाजार (Insurance Market)
विमा शब्दावली (Insurance Terminology)
विमा नियमन आणि विकास प्राधिकरण (संकल्पना, स्थापना, उद्दिष्ट्ये, कार्य व्याप्ती व अधिकार)
7. विमा संचालनालयाची माहिती (नागरिकांची सनद) – (महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अधिकार अंतर्गत उपलब्ध)
नकारात्मक गुणदान । Negative Marking of MPSC Group C Exam
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा ¼ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा ¼ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
- वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.
प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा ¼ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा एकूण दोन टप्यांत घेण्यात येते.
- पूर्व परीक्षा – 100 गुण
- मुख्य परीक्षा – 200 गुण
मुख्य परीक्षेत पेपर क्र.1 संयुक्त प्रकारचा व पेपर क्र.2 स्वतंत्र प्रकारचा असतो.