कृषी सहाय्यक भरती संपूर्ण माहिती

कृषी सहाय्यक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा कृषि पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केलेली आहे असे उमेदवार पात्र असतील. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.)

निवड झालेल्या उमेदवारांची कृषि सेवक पदी प्रथमतः 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येते व त्यांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून आल्यास पुन्हा 1 वर्षाची नियुक्ती करण्यात येते. याप्रमाणे कृषि सेवक पदी नियुक्तीचा कामाचा कालावधी 3 वर्षाचा असतो. 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे उमेदवारास कृषि सहाय्यक पदी नियुक्ती देण्यात येते.

वेतन :

कृषि सेवकास निश्चित वेतन रुपये 6000 प्रतिमाह देण्यात येते. (2019 च्या भारतीनुसार)

कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा

सर्वसाधारण उमेदवाराकरिता किमान वय 19 वर्ष व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयात सूट देण्यात येते.

कृषी सेवक पदासाठी परीक्षा पद्धती | कृषी सहाय्यक परीक्षा पद्धती

कृषि सेवक पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते.

संगणक आधारित घेण्यात येणारी परीक्षा 200 प्रश्नांची व 200 गुणांची घेण्यात येते. त्यासाठी दोन तासाचा कालावधी असतो. यामध्ये मराठी 20 प्रश्न, इंग्रजी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न,  बौद्धिक चाचणी 20 प्रश्न व कृषि विषयक 120 प्रश्न अशा एकूण 200 प्रश्नांची असते. प्रत्येक प्रश्नास एक गुण राहील.

अ. क्र. विषय प्रश्न संख्या गुण
01
English Language
20
20
02
मराठी भाषा
20
20
03
सामान्य ज्ञान
20
20
04
बौद्धिक चाचणी
20
20
05
Agriculture
120
120
-
एकूण
200
200
एकूण वेळ : 02 तास

कृषि सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम | कृषी सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम

  1. English Language

Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Fill in the blanks in the sentence

Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

Antonyms, Synonyms, Reading Comprehension, Error Spotting/ Phrase Replacement, Fill in the Blanks, Unseen Passages, Missing Verbs, Word Formation, Articles, Grammar, Adjectives, Para Jumbles, Idioms & Phrases, Cloze Test, Sentence Corrections, Verb, Adverb, Meanings, Subject-verb Agreement, Sentence Rearrangements

  1. मराठी भाषा

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, वाक्यातील त्रुटी शोधणे

प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

  1. सामान्य ज्ञान

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी,आणि इतर जनरल टॉपिक

  1. बौद्धिक चाचणी

गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण

बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, आकृत्यांची संख्या मोजणे, नातेसंबंध, निष्कर्ष किंचा अनुमान काढणे.

  1. Agriculture :

Post-Harvest Technology, Historical developments in Agriculture, Watershed Management, Herbicides and Fungicides, Plant Genetic Resources, Types of Soils, Tissue culture and Plant Genetic Engineering, Plant Diseases, Neurophysiology, Agro-based industries, Extension Education, Integrated Farming Systems, Weed flora and their management, Afforestation, Bio-diversity, Ultra Structure of Plant cells, Global warming, Fertilizer control, Insect morphology, Horticultural crops, Agricultural Economics, The importance of Horticulture, Cell structure

Chat with us