प्रजासत्ताक दिनाची परेड : उत्तर प्रदेशाने सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार जिंकला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या एकूण ३२ चित्ररथांमध्ये, १७ चित्ररथ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे, ९ चित्ररथ विविध मंत्रालयाचे व ६ चित्ररथ संरक्षण मंत्रालयाचे होते. यामध्ये उत्तर प्रदेशाकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर केला. या चित्ररथाची यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ‘ म्हणून निवड झाली. मागील वर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता.
त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक देण्यात आला. सामाजिक-आर्थिक मापदंडावर आधारित स्वावलंबन साधण्यासाठी पर्यावरणपूरक परंपरा या चित्ररथात दाखवण्यात आल्या होत्या.
उत्तराखंडच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक देण्यात आला. या चित्ररथाची थीम ‘Dev Bhumi – The Land of Gods’ ही होती.
विविध मंत्रालये, निमलष्करी दले आणि संरक्षण मंत्रालयाच्या ९ चित्ररथांपैकी जैव तंत्रज्ञान विभागाच्या चित्ररथाच्या प्रथम मान पटकावला. या चित्ररथात आत्मनिर्भर भारत अभियान : कोविड लसीच्या विकासाची प्रक्रिया दर्शवली गेली.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चित्ररथाला विशेष पुरस्कार मिळाला. सशस्त्र दलातील शाहिद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अमर जवान ही या चित्ररथाची थीम होती.
माउंट आबू पब्लिक स्कूल व विद्या भरती स्कूल रोहिणी दिल्ली याना उत्कृष्ट सांस्कृतिक कामगिरी पुरस्कार देण्यात आला. यामध्ये ३८ मुले व ५४ मुलींनी भाग घेतला. त्यांनी आत्मनिर्भर भारत तयार करण्यासाठी संपूर्ण भारताला आव्हान केले.
सर्व प्रकरच्या अपडेटसाठी
आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा CLICK HERE
आमचे फेसबूक पेज जॉइन करा CLICK HERE
ट्वीटर वर जॉइन व्हा CLICK HERE