जी-२० देशांचा गट
जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे
विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने १९९९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली
वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे
जी २० देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे ९० टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा ८० टक्के भाग या देशात आहे
जगाची दोनतृतीयांश लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा भूभाग या देशात आहे .
जी २० देश
अमेरिका, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन .
आतापर्यंत झालेल्या व होणाऱ्या सर्व जी २० परिषदा
०१ ली : २००८ : वॉशिंग्टन , अमेरिका
०२ री : २००९ : लंडन , ब्रिटन
०३ री : २००९ : पीट्सबर्ग , अमेरिका
०४ थी : २०१० : टोरांटो , कॅनडा
०५ वी : २०१० : सियोल , दक्षिण कोरिया
०६ वी : २०११ : कान्स , फ्रांस
०७ वी : २०१२ : लॉस कॉबोस , मॅक्सिको
०८ वी : २०१३ : सेंट पिटर्सबर्ग , रशिया
०९ वी : २०१४ : ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया
१० वी : २०१५ : अंतालिया , तुर्की
११ वी : २०१६ : हांगझोऊ , चीन
१२ वी : २०१७ : हैम्बर्ग , जर्मनी
१३ वी : २०१८ : अर्जेंटिना
१४ वी : २०१९ : ओसाका , जपान
१५ वी : २०२० : सौंदी अरेबिया
१६ वी : २०२१ : इटली
१७ वी : २०२२ : इंडोनेशिया
१८ वी : २०२३ : भारत
१९ वी : २०२४ : ब्राझील .