भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व त्यांची महत्वाची अधिवेशने | Indian National Congress Sessions list in Marathi

This Article Contains

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना

मार्च 1883 मध्ये ए. ओ. ह्यूम यांनी कोलकाता विद्यापीठातील पदवीधरांना पत्र लिहिले की ‘अशी 50 माणसे शोधा की जी भारतीय लोकांच्या सेवेकरिता एखाद्या संघटनेची निर्मिती करू शकतील.’

अॅलन ह्यूम यांनी 1884 साली स्थापन केलेल्या ‘इंडियन नॅशनल युनियन’ या संस्थेचे रूपांतर 1885 मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय सभेत केले.

ए. ओ. ह्यूम या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने 28 डिसेंबर 1885 साली स्थापना केली. यावेळी व्हाइसरॉय लॉर्ड डफरीन हा होता.

न्यायमूर्ती रानडे यांच्या सूचनेवरून ‘इंडियन नॅशनल युनियन’ चे नामकरण ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ करण्यात आले.

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे प्रस्तावित होते. पुण्यात कॉलऱ्याची साथ पसरल्याने 28 डिसेंबर 2885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात पहिले अधिवेशन पार पडले.

राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन: मुंबई येथे 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1885

सर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. देशभरातून 72 प्रतिनिधी या अधिवेशनाला सामील झाले होते. यामध्ये 54 हिंदू व 2 मुस्लिम प्रतिनिधी सामील होते.

Indian National Congress 1885

राष्ट्रीय सभेची महत्वाची अधिवेशने, त्यांची ठिकाणे व अध्यक्ष | Indian National Congress Sessions, Presidents etc.

खालील तक्त्यामध्ये राष्ट्रीय सभेची महत्वाची अधिवेशने, त्यांची ठिकाणे, अध्यक्ष व इतर माहिती दिली आहे.

वर्षठिकाण अध्यक्षमहत्वाचे 
    
1885मुंबईव्योमेशचंद्र बॅनर्जीपहिले अध्यक्ष
1886कोलकातादादाभाई नौरोजीदुसरे अध्यक्ष (पहिले पारशी अध्यक्ष)
1887चेन्नईबद्रुद्दीन तैय्यबजीतिसरे अध्यक्ष (पहिले मुस्लिम अध्यक्ष)
1888अलाहाबादजॉर्ज यूलचौथे अध्यक्ष – पहिले परदेशी अध्यक्ष
1900लाहोरनारायण गणेश चंदावरकर16 वे अध्यक्ष – पहिले मराठी अध्यक्ष 
1909लाहोरपंडित मदनमोहन मालवीय25 वे अध्यक्ष – रौप्यमहोत्सवी अधिवेशन 
1936फैजपूर अधिवेशनपंडित जवाहरलाल नेहरू50 वे अध्यक्ष 
1955आवडीयू. एन. देबर60 वे अधिवेशन
1985मुंबईराजीव गांधी78 वे अधिवेशन – काँग्रेस शताब्दी अधिवेशन 

राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्ष | Female President of Indian National Congress:

खालील तक्त्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्षांची यादी दिली आहे.

वर्षठिकाण अध्यक्ष
   
1917कोलकाताश्रीमती अॅनी बेझंट 
1925कानपूरसरोजिनी नायडू
1933कोलकाताश्रीमती निली सेन गुप्ता 
1959नागपूरइंदिरा गांधी
1998दिल्लीसोनिया गांधी

1. 1885 -पहिले अधिवेशन

ठिकाण: गवालिया टॅंक मैदान, संत गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा

अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी

महत्वाचे: एकूण 72 व्यक्ती उपस्थित

2. 1886 – दुसरे अधिवेशन

ठिकाण: कलकत्ता

अध्यक्ष: दादाभाई नौरोजी

महत्वाचे:  पहिले पारशी अध्यक्ष

434 सदस्य उपस्थित (33 मुस्लिम)

3. 1887- तिसरे अधिवेशन

ठिकाण: मद्रास

अध्यक्ष: बद्रुद्दीन तैय्यबजी

महत्वाचे: पहिले मुस्लिम अध्यक्ष

1887 सालीच न्या. रानडेंनी सामाजिक परिषद (Social Conference) स्थापन केली.

4. 1888- चौथे अधिवेशन

ठिकाण: अलाहाबाद 

अध्यक्ष: जॉर्ज यूल

महत्वाचे: पहिले परदेशी अध्यक्ष

1248 प्रतिनिधी हजर

‘सरकारी नोकरांनी राष्ट्रीय सभेत भाग घेऊ नये’ असे परिपत्रक सरकारने काढले.

5. 1889- पाचवे अधिवेशन

ठिकाण: मुंबई

अध्यक्ष: विल्यम बेडनबर्ग

महत्वाचे: टिळक गोखले प्रथमच उपस्थित

6. 1890 – सहावे अधिवेशन

ठिकाण: कलकत्ता

अध्यक्ष: फिरोजशाह मेहता

7. 1895 – अकरावे अधिवेशन – पुणे

अध्यक्ष: सुरेंद्रनाथ बॅनर्जी

8. 1896 – बारावे अधिवेशन – कलकत्ता

अध्यक्ष: महंमद रहिमतुल्ला सयानी

महत्वाचे: वंदे मातरम हे गीत रवींद्रनाथ टागोरांनी गायले.

9. 1900 – लाहोर अधिवेशन

अध्यक्ष: नारायण गणेश चंदावरकर

महत्वाचे: पहिले मराठी अध्यक्ष

10. 1905- कलकत्ता अधिवेशन

अध्यक्ष: दादाभाई नौरोजी

महत्वाचे: ‘वंदे मातरम’ हे गीत राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार.

स्वराज्य शब्दाचा उल्लेख प्रथम इथेच झाला.

या अधिवेशनात काँग्रेसने स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा स्वीकार केला.

11. 1907 – सुरत अधिवेशन

अध्यक्ष: रासबिहारी बोस

महत्वाचे: जहाल-मवाळ दोन गट पडले.

जहालांचे नेतृत्व लो. टिळकांकडे तर मवाळ नेतृत्व ना. गोखले यांच्याकडे.

12. 1909- लाहोर अधिवेशन

अध्यक्ष: पंडित मदनमोहन मालवीय

13. 1915 – मुंबई अधिवेशन

अध्यक्ष: सुरेंद्र प्रसन्न सिंह

14. 1916 – लखनौ अधिवेशन

अध्यक्ष: बाबू अंबिकाचरण मुझुमदार

महत्वाचे: जहाल-मवाळ ऐक्य

15. 1917 – कलकत्ता अधिवेशन

अध्यक्ष: श्रीमती अॅनी बेझंट

महत्वाचे: पहिली महिला अध्यक्ष

16. 1920 – कलकत्ता अधिवेशन

अध्यक्ष: लाला लजपतराय

महत्वाचे: काँग्रेसचे हे खास अधिवेशन होते.

17. 1920 – नागपूर अधिवेशन

अध्यक्ष: चक्रवर्ती विजय राघवाचार्य

महत्वाचे: असहकार चळवळीचा मसुदा संमत.

18. 1923 – दिल्ली अधिवेशन

अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद

महत्वाचे: सर्वात तरुण अध्यक्ष (वय 34 वर्ष)

19. 1925 – कानपुर अधिवेशन

अध्यक्ष: सरोजिनी नायडू

महत्वाचे: पहिली भारतीय महिला अध्यक्ष

‘झंडा उंचा रहे हमारा’ हे गीत सर्वप्रथम गायले गेले. ते गणेश शंकर’ या विद्यार्थ्याने म्हटले होते. याची रचना ‘श्यामलाल गुप्त पार्षद’ यांनी केली.

20. 1928 – कलकत्ता अधिवेशन

अध्यक्ष: मोतीलाल नेहरू

21. 1929 – लाहोर अधिवेशन

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू.

महत्वाचे: 31 डिसेंबर रावी नदीच्या तीरावर संपूर्ण स्वराज्याची मागणी याच अधिवेशनात करण्यात आली.

26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला.

22. 1931 – कराची अधिवेशन

अध्यक्ष: सरदार वल्लभभाई पटेल

महत्वाचे: या अधिवेशनानंतर काँग्रेसला बेकायदेशीर घोषित.

23. 1936 – फैजपूर अधिवेशन

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू

महत्वाचे: ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

24. 1938 – हरिपूर अधिवेशन

अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस 

25. 1939 – त्रिपुरा अधिवेशन

अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस

26. 1942 – मुंबई अधिवेशन

अध्यक्ष : अब्दुल कलाम आझाद

महत्वाचे: सर्वात दीर्घकाळ राहिलेले अध्यक्ष

27. 1946 – मीरत अधिवेशन

अध्यक्ष: आचार्य कृपलानी

महत्वाचे: भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी अध्यक्ष.

28. 1948 –

अध्यक्ष: पट्टाभिसीतारमैय्या

महत्वाचे: गांधीजींची हत्या झाली.

29. 1955 – आवडी अधिवेशन

अध्यक्ष: यू. एन. ढेबर

30. 1959 – नागपूर अधिवेशन

अध्यक्ष: इंदिरा गांधी

31. 1985 – मुंबई अधिवेशन

अध्यक्ष: राजीव गांधी

महत्वाचे: काँग्रेस चे शताब्दी अधिवेशन.

If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us