MPSC Exam 2022 All Updates | MPSC Latest Update | MPSC परीक्षा 2022 सर्व अपडेट्स
This Article Contains
Toggleया पेजवर तुम्हाला MPSC परीक्षा 2022 चे सर्व अपडेट्स पाहायला मिळतील. या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही या पेजला भेट देऊ शकता किंवा आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) मुलाखती औरंगाबाद येथे
(दि. 31/10/2022) जा. क्र. 283/2021 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) विशेषज्ञ संवर्ग, गट अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 14 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत औरंगाबाद येथे आयोजित करण्यात येत आहेत. या मुलाखती सकाळी 10 वाजता घेण्यात येतील.
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांची यादी पहा
अधिकृत वेबसाईट पहा
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात येत आहे.
(दि. 31/10/2022) जा. क्र. 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांचा शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 2 रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. तथापि, प्रशासकीय कारणात्सव सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
प्रसिद्धीपत्रक PDF पहा
अधिकृत वेबसाईट पहा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लेखनिक परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध
(दि. 29/10/2022) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उमेदवारांची यादी पहा
MPSC महाराष्ट्र गट क परीक्षा 2021 मुख्य परीक्षा तारीख जाहीर | MPSC Group C 2021 Mains Exam Dates Declared
(दि. 28/06/2022) दिनांक 03 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधून भरावयाच्या लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक तसेच उद्योग निरीक्षक संवर्गाच्या दिनांक 28 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
MPSC Tax Assistant and Clerk-Typist 2021 Result Declared
(दि. 28/06/2022) जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील कर सहायक व लिपिक टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC Technical Assistant, State Inspector-State Excise and Technical Assistant 2021 Result Declared
(दि. 28/06/2022) जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 195/2021 सहयोगी प्राध्यापक बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, गट अ संवर्गाच्या मुलाखतीला पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीस अनुपस्थित राहिल्याने प्रस्तुत पदाकरीता कोणत्याही उमेदवारीची शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 176/2021 सहायक प्राध्यापक जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, गट ब संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 95/2021 सहयोगी प्राध्यापक जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 187/2021 सहयोगी प्राध्यापक अस्थिव्यंगोपचार शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, गट अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 208/2021 सहायक प्राध्यापक बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, गट ब संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 222/2021 सहयोगी प्राध्यापक बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, गट अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 120/2021 सहयोगी प्राध्यापक शरीररचना शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, गट अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(दि. 27/06/2022) शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
(दि. 25/06/2022) अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखालील सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब संवर्गाची पदे राज्य सेवा परिक्षेमधून भरण्यात येतील. त्याकरिता कोणत्याही विद्या शाखेतील पदवी अशी अर्हता आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात बदल
(दि. 25/06/2022)
(दि. 23/06/2022)
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या अखत्यारीतील शासकीय मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक व्यवस्थापक,शासकीय मुद्रणालय,गट ब संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अखत्यारीतील शासकीय मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (मोठी मुद्रणालये), गट अ संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि व प.दु.म. विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या 22 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि व प.दु.म. विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या 2 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब – 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध
(दि. 23/06/2022)महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येईल. (जा. क्र. 53/2022)
सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ चाळणी परीक्षा दिनांक जाहीर
(दि. 22/06/2022) सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या भरती प्रक्रियेकरीताची चाळणी परीक्षा रविवार, दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. (जा. क्र. 001/2022)
या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरिल परीक्षा या सदारमधील ‘परीक्षेचा अभ्यासक्रम’ येथे उपलब्ध आहे.
जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात येतील.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट-अ संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
(दि. 22/06/2022) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 17 जून 2022 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट-अ संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 22 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. (जा.क्र.259/2021)
गृहपाल, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद गट-ब संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
(दि. 22/06/2022) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 17 जून 2022 रोजी घेण्यात आलेल्या गृहपाल, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद गट-ब संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 22 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. (जा.क्र.254/2021)
सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र, (सतारा) पदाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
(दि. 22/06/2022) सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (जा.क्र.118/2021)
सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र, पदाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
(दि. 22/06/2022) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 15 व 16 जून 2022 रोजी घेण्यात आलेल्या सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ पदाच्या मुलाखतीचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 22 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. (जा.क्र.93/2021)
प्राध्यापक अस्थिव्यंगोपचार मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर । Professor Orthopedics Interview Schedule
(दि. 22/06/2022) जा.क्र.64/2021 प्राध्यापक अस्थिव्यंगोपचार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गट-अ संवर्गाच्या मुलाखती दि.28 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Professor Orthopedics, Maharashtra Medical Education and Research Services, Gr-A Medical Education and Drugs Department Advt. No. 064/2021
MPSC Exam Schedule 2022 | MPSC परीक्षा वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या 2022 मधील सर्व परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर 3 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अधिसूचनेची PDF खाली देण्यात आली आहे.
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 सुधारित निकाल जाहीर | Maharashtra Forest Service Exam 2019 Result Declared
(20 जून 2022): महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल याआधी 29 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेचा सुधारित निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विषयांकित परीक्षेकरिता सुधारित गुणवत्ता यादी, सुधारित शिफारस यादी, गुणांची प्रवर्गनिहाय सीमारेषा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिफारसपात्र उमेदवारांची संबंधित संवर्गासाठीची पात्रता तसेच प्रमाणपत्रांची वैधता सक्षम प्राधिकारणांकडून तपासण्याच्या अटीवर शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 24 जून 2022 रात्री 23.59 वाजेपर्यंत
Full Details CLICK HERE
(दि. 27/06/2022) जाहिरात क्रमांक 222/2021 सहयोगी प्राध्यापक बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, गट अ संवर्गाचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.