MPSC Rajyseva Latest Update 2022 । राज्यसेवा परीक्षा 2022 सर्व अपडेट्स
This Article Contains
Toggleराज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द | MPSC State Service Mains Exam Dates Declared
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. 14 नोव्हें. 2022 ते 28 नोव्हें. 2022
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 दिनांक 21, 22 व 23 जानेवारी रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल.
अधिसूचना पहा
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 निकाल जाहीर | MPSC State Service Preliminary Exam 2022 Result Declared
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्रसिद्धीपत्रक पहा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुख्य परीक्षा दिनांक 21, 22 व 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येईल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सीमारेषा | MPSC State Service Preliminary Exam 2022 Cut Off
पात्र उमेदवारांची यादी पहा
अधिकृत वेबसाईट
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध | MPSC State Service Preliminary Exams 2022 Final Answer Key Released (03 Nov 2022)
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-2022’ या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या हरकती,विचारात घेऊन आयोगाने सुधारित उत्तरतालिका जाहीर केली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर-1 अंतिम उत्तरतालिका
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर-2 अंतिम उत्तरतालिका
अधिकृत वेबसाईट
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 शुद्धिपत्रक प्रसिद्ध – पदसंख्येत वाढ (31/11/2022)
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता दिनांक 11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण 161 पदांचा समावेश करण्यात आला होता.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता दिनांक 11 मे 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रस्तुत परीक्षेकरिता काही नवीन संवर्गातील 462 पदांचे अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता विज्ञापित 161 पदे तसेच अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त 462 पदे विचारात घेऊन एकूण पदे 623 पदांसाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल.
शुद्धिपत्रक PDF पहा.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात बदल | MPSC Rajyaseva Mains Exam Pattern Changed
(25/06/2022) राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत आयोगाकडून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
(17/06/2022) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/संधी मर्यादित करण्याचा निर्णय आयोगाकडून रद्द करण्यात आला असून आयोगाच्या या निर्णयास अनुसरून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता दिनांक 11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 7.8 रद्द करण्यात आला आहे.
या परीक्षेच्या जाहिरातीमधील परीक्षेच्या संधींसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याचशा उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केला नसल्याची शक्यता असल्यामुळे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 24 जून 2022 रात्री 23:59 वाजेपर्यंत