तलाठी भरती 2023

This Article Contains

तलाठी भरती 2023 | Talathi Bharti 2023

Talathi Bharti Latest Update : 27/09/2023

तलाठी भरती परीक्षा उत्तरपत्रिका 28 तारखेपासून उपलब्ध | Talathi Bharti Answer Key Released

राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हरकत नोंदवण्यासाठी प्रत्येक हरकतील 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केले जाईल.

उत्तरपत्रिका पाहण्यासाठी लिंक

Talathi Bharti Latest Update : 22/09/2023

तलाठी भरती 2023 करिता उपस्थित उमेदवारांची आकडेवारी जाहीर | Talathi Bharti Exam Attendance Released

तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान एकूण 57 शिफ्ट मध्ये घेण्यात आली आहे. प्रत्येक शिफ्ट नुसार उमेदवारांची उपस्थिती खाली देण्यात आली आहे.

उमेदवारांची उपस्थिती पहा.

Talathi Bharti Latest Update : 21/09/2023

तलाठी भरती 2023 सरळसेवा पदभरती दुबार शुल्क परत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक

महसूल विभागातील तलाठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षेकरिता एकूण 1041713 अर्ज प्राप्त झाले आहेत. काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परीक्षा शुल्क जमा करण्यात आले आहेत. दुबार परीक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपैकी 23379 उमेदवारांचे परीक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. परंतु 1299 उमेदवारांचे नाव व बँक खात्यावरील नाव हे विसंगत असल्यामुळे अडचणी येत आहेत. तरी या उमेदवारांनी खालील माहिती talathi.recruitment2023@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवण्यात यावी.

  1.  उमेदवाराचे नाव:
  2.  बँकेचे नाव :
  3.  बँक खाते क्रमांक
  4.  बँकेचा IFSC Code :
  5.  रजिस्ट्रेशन नंबर :
  6.  मोबाईल नंबर:
  7.  ई-मेल आयडी:

PDF पहा.

Talathi Bharti Latest Update : 14/08/2023

तलाठी भरती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर

TCS कंपनीमार्फत तलाठी भरती 2023 परीक्षेकरिता जिल्हानिहाय अर्ज संख्या प्राप्त झाली आहे.

  • सगळ्यात जास्त अर्ज आलेले जिल्हे

1) पुणे – 114684

2) रायगड – 100537

3) नाशिक – 68028

  • सगळ्यात कमी अर्ज आलेले जिल्हे

1) वाशिम – 2636

2) मुंबई शहर – 3793

3) अकोला – 6404

PDF पहा.

Talathi Bharti Latest Update : 09/08/2023

तलाठी भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Talathi Bharti 2023 Hall Ticket Available

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 19 दिवस असेल. ही परीक्षा 3 सत्रात आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठीची तारीख व परीक्षेचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या 3 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यांचे परीक्षेचे ठिकाण व तारीख दाखवत नसेल त्यांचे परीक्षा ठिकाण व तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Talathi Bharti Latest Update : 09/08/2023

तलाठी भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | Talathi Bharti Exam Schedule Declared

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 19 दिवस असेल. ही परीक्षा 3 सत्रात आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खालील PDF पहा.

संपूर्ण वेळापत्रक पहा.

Talathi Bharti Latest Update : 24/07/2023

तलाठी भरती फॉर्म शुल्क परत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा शुल्क जमा केलेले आहे अशा उमेदवारांकडून जास्तीचे शुल्क परतावा मागणी केलेली आहे. त्यानुसार एकाच नोंदणी क्रमांकाकरिता एकापेक्षा अधिक वेळा शुल्क विभागाकडे प्राप्त झालेले अशा उमेदवारांचे जास्तीचे जमा झालेले शुल्क विभागाकडून पडताळणीअंती परतावा करण्यात येणार आहे.

सदर शुल्क परतावा हा उमेदवाराने ज्या बँक खात्यातून शुल्क अदा केले आहे त्याच बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त 7 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे.

Talathi Bharti Latest Update : 21-07-2023

तलाठी भरती अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ - शेवटची तारीख 25 जुलै 2023

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 17/07/2023 ही शेवटची तारीख होती. प्रशासकीय कारणास्तव तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/07/2023 रात्री 23.55 ही असेल.
आता पुन्हा एकदा तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील मुदत 25 जुलै 2023 असेल.
अधिकृत नोटीस पहा.

Talathi Bharti Latest Update : 17-07-2023

तलाठी भरती अर्ज करण्यास मुदतवाढ | Talathi Bharti Form Filling Date Extended

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 17/07/2023 ही शेवटची तारीख होती.

प्रशासकीय कारणास्तव तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/07/2023 रात्री 23.55 ही असेल.

Talathi Bharti Latest Update
Talathi Bharti Latest Update : 23-06-2023

तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | Talathi Bharti 2023 Apply Here

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी संवर्गातील एकूण 4644 पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण जागा : 4644

अर्ज करण्यास सुरुवात : 26/06/2023

अर्ज करण्यास शेवट: 17/07/2023

परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्ग : 1000 रु.

मागास प्रवर्ग : 900 रु. 

जिल्हानिहाय जागांचा तपशील पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.

अ. क्र. जिल्ह्याचे नाव जागा
01
अहमदनगर
250
02
अकोला
41
03
अमरावती
56
04
छ. संभाजीनगर
161
05
बीड
187
06
भंडारा
67
07
बुलढाणा
49
08
चंद्रपूर
167
09
धुळे
205
10
गडचिरोली
158
11
गोंदिया
60
12
हिंगोली
76
13
जालना
118
14
जळगाव
208
15
कोल्हापूर
56
16
लातूर
63
17
मुंबई उपनगर
43
18
मुंबई शहर
19
19
नागपूर
177
20
नांदेड
119
21
नंदुरबार
54
22
नाशिक
268
23
धाराशिव
110
24
परभणी
105
25
पुणे
383
26
रायगड
241
27
सांगली
98
28
सातारा
153
29
सिंधुदुर्ग
143
30
सोलापूर
197
31
ठाणे
65
32
वर्धा
78
33
वाशीम
19
34
यवतमाळ
123
35
पालघर
142
36
रत्नागिरी
185
Talathi Bharti Latest Update : 03-06-2023

तलाठी भरती नवीन अपडेट | Talathi Bharati Latest Update | जाहिरात लवकरच येण्याची चिन्हे

महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत तलाठी संवर्गातील एकूण – 4625 पदांच्या सरळसेवा भरतीकरिता 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हाकेंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच जाहीर करण्यात येईल.

अर्ज सादर करण्याचा कालावधी जून 2023 ते जुलै 2023 असेल.

Talathi Bharti Latest Update : 20-06-2022

येथे तुम्हाला तलाठी भरती परीक्षा 2022 चे सर्व अपडेट्स पाहायला मिळतील. तलाठी भरती 2022 लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडून तलाठी रिक्त जागांचा तपशील मागवला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तलाठी पदांच्या एकूण 72 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. 

Talathi Pune Vacancies
2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us