सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2026 संपूर्ण माहिती । MPSC RTO AMVI परीक्षा संपूर्ण माहिती | RTO AMVI recruitment 2026 Maharashtra
This Article Contains
ToggleTable of Contents
राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात. महाराष्ट्रात कोठेही नियुक्ती करण्यात येते तर वेतन स्तर एस-14 : रुपये. 38600 ते 122800 + महागाई भत्ता व इतर भत्ते देण्यात येतात.
AMVI सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी लागणारी पात्रता | MPSC RTO AMVI qualification in Maharashtra | RTO Exam Eligibility Criteria Maharashtra | AMVI Exam Maharashtra Eligibility
1. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. | ||||||
2. वयोमर्यादा | ||||||
किमान वय | कमाल वय | |||||
सर्वसाधारण | प्रावीण्यप्राप्त खेळाडू | माजी सैनिक | ||||
अमागास | मागासवर्गीय/ अनाथ | अमागास | मागासवर्गीय/ अनाथ | अमागास | मागासवर्गीय/ अनाथ | |
19 वर्षे | 38 वर्षे | 43 वर्षे | 43 वर्षे | 43 वर्षे | 43 वर्षे + सेवा कालावधी + 3 वर्षे | 43 वर्षे + सेवा कालावधी + 3 वर्षे |
3. शैक्षणिक अर्हता | AMVI Qualification in Maharashtra for MPSC | MPSC RTO AMVI Qualification in Maharashtra
SSC + Diploma in Automobile Engineering/Diploma in Mechanical Engineering/केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.
किंवा
SSC + Degree in Automobile Engineering/Diploma in Mechanical Engineering/केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.
4. अनुभव | AMVI Experience in Maharashtra for MPSC | Experience Required MPSC RTO
· मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत यंत्रशाळांमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक.
· अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील.
5. वैध अनुज्ञप्ती (Licence)
· मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटारसायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन (जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन) या संवर्गासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुज्ञप्ती (Licence) आवश्यक.
· अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड मालवाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालविण्याची अनुज्ञप्ती (Licence) नसेल तर अशा उमेदवारस अशी अनुज्ञप्ती, नियुक्तीनंतरच्या दोन वर्षाच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल.
6. शारीरिक अर्हता | AMVI Physical Criteria Maharashtra
शारीरिक अर्हता खालीलप्रमाणे आवश्यक:
पुरुष उमेदवार: | महिला उमेदवार |
1. उंची – 163 सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी) 2. छाती: किमान 79 सें. मी. प्रसारणाशिवाय व किमान 5 सें. मी. प्रसारण | 3. उंची – 155 सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी) 4. वजन – 45 कि. ग्रॅ. (कमीत कमी) |
जे रंगांध नसून, ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे.
परीक्षा शुल्क | Exam Fee
| अमागास | मागासवर्गीय/अनाथ | माजी सैनिक |
1. पूर्व परीक्षा | 374 रुपये | 274 रुपये | 24 रुपये |
2. मुख्य परीक्षा | 524 रुपये | 324 रुपये | 24 रुपये |
विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागास वर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटात (क्रिमी लेयर) मोडणाऱ्या उमेदवारांनी त्यांना आरक्षणाचा व वयोमर्यादेचा फायदा देय नसल्याने त्यांनी अमागास उमेदवारांप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
परीक्षा योजना | MPSC RTO AMVI Exam Details
पूर्व परीक्षा | MPSC RTO AMVI Preliminary Exam Details
1. एकूण गुण: 100
2. प्रश्नपत्रिका: प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे असेल.
विषय | सांकेतांक | माध्यम | प्रश्नसंख्या | गुण | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी (दर्जा : माध्यमिक शालान्त परीक्षेसमान) + यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी (दर्जा: पदविकेसमान) | 04 | मराठी व इंग्रजी | 100 | 100 | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
अभ्यासक्रम | RTO Maharashtra Exam Syllabus | AMVI Exam Maharashtra Syllabus | AMVI Preliminary Exam Maharashtra Syllabus
1. सामान्य अध्ययन: चालू घडामोडी, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह), नागरिकशास्त्र. |
2. बुद्धिमापन चाचणी: उमेदवार किती लवकर व अचूकपणे करू शकतो, याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर चाचणीमध्ये प्रश्न विचारण्यात येतील. |
3. यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी: Latest trends and technological development in the field of Mechanical and Automobile Engineering. |
परीक्षा केंद्रे | AMVI Exam Centres
खालील ठिकाणी सदर परीक्षा घेण्यात येते.
केंद्र | केंद्राचा सांकेतांक |
| केंद्र | केंद्राचा सांकेतांक |
औरंगाबाद | 15 |
| नागपूर | 32 |
मुंबई | 30 |
| पुणे | 38 |
वरील जिल्हा केंद्रांमधून कोणतेही एक केंद्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना निवडणे आवश्यक आहे.
पूर्व परीक्षेचा निकाल | AMVI Preliminary Exam Result
· वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
· भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील.
मुख्य परीक्षा | MPSC RTO AMVI Mains Exam Details
परीक्षेचे टप्पे: एक
लेखी परीक्षा – 300 गुण
प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
विषय | सांकेतांक | माध्यम | प्रश्नसंख्या | गुण | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी (दर्जा: संबंधित विषयाच्या पदविकेसमान) | 24 | फक्त इंग्रजी | 150 | 300 | दीड तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
मुख्य परीक्षेच्या ‘यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी‘ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील Section ‘A’ मधील प्रश्न अनिवार्य असतील. मात्र Section ‘B’ किंवा Section ‘C’ यापैकी एकाच Section मधील प्रश्न उमेदवारांनी सोडवायचे आहेत.
अभ्यासक्रम | RTO Maharashtra Exam Syllabus | AMVI Exam Maharashtra Syllabus | AMVI Mains Exam Maharashtra Syllabus
Section A: Mechanical and Automobile Engineering – (120 Questions and 240 Marks) |
(1) Strength of Materials: – Stress and strain, strain energy, shearing force and bending moment, moment of inertia, Principal planes and stresses, slope and deflection, Direct and bending stresses, Columns, Torsion and thin cylinders. |
(2) Mechanical Technology: Engineering materials, Non chip forming processes, chip Forming process: Turning, Drilling, Milling, Boring, Broaching, Finishing and super finishing, Gear production as well as NC-CNC and non-conventional machining methods. |
(3) Theory of Machines: Kinematics and dynamics of machines, role of friction, different power devices and power transmission equipments such as governers, gyroscopes etc, Applications of cams. |
(4) Hydraulics: Fluids and their properties, Laminar and turbulent flow, Bernaulli’s Equation, Fluid pressure, Pascal’S Law, Surface tention, fluid flow and its measurement. |
(5) Thermal Engineering: Sources of energy: Conventional and non-conventional, Laws of thermodynamics, Principle and working of heat engines, air compressors. Air Standard, vapour power and Gas power cycles. |
(6) A. Automobile Engines: Theory, working and constructional features of C.I. and S.I. engines, Combustion phenomena and various ignition systems, Fuels and Lubricants, Performance and Testing of I.C. Engines, Pollution control. B. Industrial Electronics: Diods, UJT, BJT, amplifiers, microprocessors |
Section B: Mechanical Engineering – (30 Questions and 60 Marks) |
(1) Hydraulic Machinary: Imapact of jet, Hydraulic turbines, Hydraulic pumps: Centrifugal, reciptrocating and other types, Hydraulic control circuits. |
(2) Refrigeration and Air Conditioning: Refrigerator and heat pump, Vapour compression and vapour absorption refrigeration systems, Refrigerants, Psychrometry, Air conditioning and its applications. |
(3) Industrial Engineering: Types of production, plant layouts, process planning, work study, statistical quality control, Metrology |
OR |
Section C: Automobile Engineering-(30 Questions and 60 Marks) |
(1) Automobile Systems: Vehicle layout, Transmission system, breaking systems, ABS, Steering and suspension system, Chasis Frame and Body engineering. |
(2) Vehicle Maintenance: Performance of vehicles, engine electricals and electronics, workshop layout, repairing and servicing, Emission measurements and control techniques. |
(3) Transport Management: Elements of transport and its operations, Motor Vehicle Act, Taxation, Insurance. |
परीक्षा केंद्रे | AMVI Exam Centres
खालील ठिकाणी सदर परीक्षा घेण्यात येते.
केंद्र | केंद्राचा सांकेतांक |
| केंद्र | केंद्राचा सांकेतांक |
औरंगाबाद | 15 |
| नागपूर | 32 |
मुंबई | 30 |
| पुणे | 38 |
लेखी परीक्षेचा निकाल | AMVI Preliminary Exam Result
वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील.तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
शारीरिक क्षमता व प्रमाणपत्र पडताळणी | AMVI Physical Exam and Document Verification
प्रस्तुत परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमतेबाबतची मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील.
FAQ:
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा ही दोन टप्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते तर मुख्य परीक्षा 300 गुणांची असते.
यासाठी आमचे लेलिग्राम चॅनेल जॉईन करा. टेलिग्राम चॅनेलवर याबाबतचे अपडेट कळवण्यात येईल.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षापद्धती वेबसाईटवर उपलब्ध आहे. किंवा गूगल व सर्च करा “truexams AMVI Syllabus” तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.
Related Posts
धर्मादाय आयुक्तालय भरती अभ्यासक्रम | Dharmaday Aayuktalay Bharti Syllabus
