पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे शिपाई पदाची भरती - 2026 नवीन अपडेट
Previous Updates
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे शिपाई पदाची भरती - 2026 जाहिरात प्रसिद्ध
Date:
04.08.2026
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे शिपाई
पदाची भरती – 2026 (289 जागा)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी
शिपाई पदांची 289 पदे ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षेद्वारे भरण्याकरिता फक्त पुणे
जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत.
(उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षेपासूनचा
रहिवासी असावा.)
अ. क्र.
पदाचे नाव
एकूण जागा
शैक्षणिक
पात्रता
01
शिपाई
289
उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (HSC) उत्तीर्ण असावा
किंवा 12 वी समकक्ष पदविका (Diploma) उत्तीर्ण असावा.