पनवेल महानगरपालिका भरती 2023

This Article Contains

पनवेल महानगरपालिका भरती 2023 सर्व अपडेट्स

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला पनवेल महानगरपालिका भरती 2023 भरती पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

Panvel Mahanagarpalika Bharti Latest Update : 11/10/2023

पनवेल महानगरपालिका भरती परीक्षेची अंदाजित तारीख जाहीर

पनवेल महानगरपालिका पदभरतीकरिता अर्ज सादर करण्याचा दिनांक 13/07/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15/09/2023 असा करण्यात आला. महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ही 08/12/2023 ते 11/12/2023 असा निर्धारित करण्यात आला आहे.

Panvel Mahanagarpalika Exam Dates

Panvel Mahanagarpalika Bharti Latest Update : 10/10/2023

पनवेल महानगरपालिका भरती प्राप्त अर्जांची संख्या

पनवेल महानगरपालिका पदभरतीकरिता अर्ज सादर करण्याचा दिनांक 13/07/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15/09/2023 असा करण्यात आला. या वेळेत करण्यात आलेल्या अर्जाची संख्या खाली देण्यात आली आहे.

Panvel Mahanagarpalika Form Count 1

Panvel Mahanagarpalika Bharti Latest Update : 29/08/2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ तसेच आरक्षणामध्ये बदल

पनवेल महानगरपालिका पदभरतीकरिता अर्ज सादर करण्याचा दिनांक 13/07/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15/09/2023 असा राहील.

तसेच

वैद्यकीय अधिकारी गट-अ (अराजपत्रीत) या पदांचे आरक्षण निश्चित झाल्यामुळे जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या सदर पदांच्या सामाजिक आरक्षणामध्ये बदल करण्यात आला आहे. समांतर आरक्षणामध्ये कोणताही बदल नसेल. आरक्षणामधील बदल पाहण्यासाठी खालील PDF पहा.

Notice PDF पहा

Panvel Mahanagarpalika Bharti Latest Update : 17/08/2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्यास मुदतवाढ

पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘गट-अ’ ते ‘गट-ड’ मधील रिक्त असणारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.  एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/07/2023 पासून 17/08/2023 रोजी पर्यंत होता. अर्ज करण्याचा कालावधी वाढवण्यात आला असून आता  तारीख 31 ऑगस्ट 2023 असेल

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

अधिकृत वेबसाईट

Update On: 13 July 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘गट-अ’ ते ‘गट-ड’ मधील रिक्त असणारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखापरीक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/07/2023 पासून 17/08/2023 रोजी पर्यंत आहे.

पदांची नावे:

Panvel Mahanagarpalika Bharti Posts
Panvel Mahanagarpalika Bharti Posts

एकूण पदे । Panvel Mahanagar Palika Vacancy 2023

एकूण पदे: 377

महत्वाच्या तारखा | Important Dates

Important Dates
01
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
13/07/2023
02
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
17/08/2023 – 31/08/2023
03
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेचा अंतिम दिनांक
17/08/2023 -31/08/2023
04
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 07 दिवस आधी
05
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

शैक्षणिक, शारीरिक व इतर पात्रता | Panvel Mahanagarpalika Bharti Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक/शारीरिक पात्रता देण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात वाचा.

परीक्षेचा अभ्यासक्रम | Panvel Mahanagarpalika Bharti Exam Syllabus

पदानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आली आहे. खाली दिलेल्या PDF मध्ये सर्व पदांसाठी असणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

परीक्षा शुल्क | Panvel Mahanagarpalika Bharti Exam Fees

गट खुला प्रवर्ग मागास/अनाथ प्रवर्ग
गट अ & ब
रु. 1000
रु. 900
गट क
रु. 800
रु. 700
गट ड
रु. 600
रु. 500

वयोमर्यादा | Panvel Mahanagarpalika Bharti Age Limit

18 ते 38 वर्षे. मागास उमेदवारांना खालीलप्रमाणे सूट असेल.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Age Relaxation

संपूर्ण जाहिरात पहा

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

अधिकृत वेबसाईट

Chat with us