Homeइतर माहितीविविध उत्पादन क्षेत्रातील क्रांती | Revolutions in Various Manufacturing Sectors
विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांती | Revolutions in Various Manufacturing Sectors
February 18, 2021
Revolutions in Various Manufacturing Sectors
स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये झालेले उत्पादन व त्या उत्पन्नासाठी दिलेल्या क्रांतीचे नाव यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एखाद्या उत्पन्नाशी संबंधित क्रांतीचे नाव माहित असणे आवश्यक आहे. खाली विविध क्रांती व ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याची यादी दिली आहे.
हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादन
निल क्रांती : मत्स्य उत्पादन
पीत क्रांती : तेलबिया उत्पादन
सुवर्ण क्रांती : फळे उत्पादनात वाढ
सुवर्ण तंतू क्रांती : ताग उत्पादन
कृष्ण क्रांती : पेट्रोलियम क्षेत्र
करडी क्रांती : खत उत्पादन
धवल क्रांती : दुग्ध उत्पादन
गुलाबी क्रांती : कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
चंदेरी क्रांती / रजत धागा क्रांती : अंडी उत्पादन
चंदेरी तंतू : कापूस
अमृत क्रांती : नद्या जोड प्रकल्प
लाल क्रांती : टोमॅटो/मांस किंवा शेळी मेंढी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती : कोको उत्पादन
गोल क्रांती : बटाटे उत्पादन
नारंगी : युक्रेन मधील क्रांती
इंद्रधनुष्य : कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.
श्वेतक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ
लाल क्रांती : शेळी-मेंढी उत्पादनात वाढ
सुवर्ण क्रांती : मधाचे उत्पादन
वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेयर करा.
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.