Khelo India Youth Games | खेलो इंडिया युथ गेम्स
February 17, 2021
This Article Contains
Toggleखेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात 2018 साली खेळ मंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केली. हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येतो. या खेळांमध्ये भारतातील शाळांमधील व कॉलेजमधील मुले सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्या वर्षी 31 जानेवारी 2018 ला नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम येथे करण्यात आले. दुसऱ्या वर्षी ९ जानेवारी ते 20 जानेवारी 2019 ला पुणे येथे आयोजन करण्यात आले तर तिसरे खेलो इंडिया युथ गेम्स 18 जानेवारी ते 30 जानेवारी ला गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आले. चौथे खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे वय 17 पेक्षा कमी आहे ते विध्यार्थी अंडर 17 गटात खेळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे वय 17 ते 21 आहे ते अंडर 21 गटात खेळू शकतात. ज्या विध्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांना अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. खेलो इंडिया तर्फे दरवर्षी 1000 जणांना निवडले जाते.
Khelo India youth games 2018 | पहिली खेलो इंडिया युथ गेम्स 2018
स्थळ : नवी दिल्ली
- हरियाणा (102 मेडल्स , 38 सुवर्ण)
- महाराष्ट्र (111 मेडल्स , 36 सुवर्ण)
- दिल्ली (94 मेडल्स , 25 सुवर्ण)
Khelo India Youth Games 2019 | दुसरी खेलो इंडिया युथ गेम्स 2019
स्थळ : पुणे , महाराष्ट्र
- महाराष्ट्र (228 मेडल्स , 85 सुवर्ण)
- हरियाणा (178 मेडल्स , 62 सुवर्ण)
- दिल्ली (136 मेडल्स , 48 सुवर्ण)
Khelo India Youth Games 2020 | तिसरी खेलो इंडिया युथ गेम्स 2020
स्थळ : गुवाहाटी , आसाम.
- महाराष्ट्र (256 मेडल्स , 78 सुवर्ण)
- हरियाणा (200 मेडल्स , 68 सुवर्ण)
- दिल्ली (122 मेडल्स , 39 सुवर्ण)
Khelo India Youth Games 2021 | चौथी खेलो इंडिया युथ गेम्स 2021
स्थळ : पंचकुला , हरियाणा.
(ही स्पर्धा 2021 मध्येच होणार होती परंतु कोविड च्या प्रसारामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ही स्पर्धा 4 जून ते 13 जून 2022 मध्ये घेयात आली.)
- हरियाणा (137 मेडल्स , 52 सुवर्ण)
- महाराष्ट्र (125 मेडल्स , 45 सुवर्ण)
- कर्नाटक (67 मेडल्स , 22 सुवर्ण)
Khelo India youth games 2022 | खेलो इंडिया युथ गेम्स 2022
स्थळ : नवी दिल्ली
Khelo India youth games 2023 | खेलो इंडिया युथ गेम्स 2023
स्थळ : मध्यप्रदेश (भोपाळ)
नथू बारखेडा गावात ५० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
खेलो इंडिया युथ गेम्सविषयी महत्वाचे
- खेलो इंडिया युथ गेम्स 2018 साली खेळ मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरुवात केली.
- युथ गेम्स दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येतात.
- युथ गेमची नोडल एजन्सी म्हणून इंडियन स्कूल गेम्स ऑफ इंडिया काम पाहते.
- ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
FAQ:
खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात 2018 साली झाली.
खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चे आयोजन हरियाणा येथे करण्यात आले होते.
खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे आयोजन मध्यप्रदेश (भोपाळ) येथे होणार आहे.
Post Views: 3,273