नगर रचना विभाग भरती 2023 सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला नगर रचना विभाग भरती 2023  पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

नगर रचना विभाग भरती 2023 Latest Update : 20/09/2023

नगर रचना विभाग भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या https://www.urban.maharashtra.gov.in/ व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या http://www.dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि. 20/09/2023 रोजी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पदाचे नाव :

शिपाई

एकूण पदे:

125

शैक्षणिक पात्रता:

माध्यमिक शालान्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी/खेळाडूंसाठी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 05 वर्षे शिथिलक्षम  राहील.)

अभ्यासक्रम व परीक्षापद्धती :

ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची (प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी मराठी + इंग्रजी + सामान्य ज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षा 2 तासांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची असेल. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धत अवलंबली जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल.

परीक्षा शुल्क | Exam Fees
खुला प्रवर्ग मागास/अनाथ प्रवर्ग/EWS
रु. 1000
रु. 900
महत्वाच्या तारखा | Important Dates
Important Dates
01
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
20/09/2023
02
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
20/10/2023
03
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेचा अंतिम दिनांक
20/10/2023
04
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 07 दिवस आधी
05
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

संपूर्ण जाहिरात पहा

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

अधिकृत वेबसाईट 1

अधिकृत वेबसाईट 2

Chat with us