Homeचालू घडामोडीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड
February 18, 2021
या वर्षी नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.
जयंत नारळीकर यांची विज्ञानकथा पुस्तके
वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी
टाइम मशीनची किमया
याला जीवन ऐसे नाव
जयंत नारळीकर यांची इतर पुस्तके
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
गणितातील गमतीजमती
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
नभात हसरे तारे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)
७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू ८१वे : २००८ : सांगली : म. द. हातकणंगलेकर ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव ८३वे : २०१० : पुणे : द. भि. कुलकर्णी ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके ८६वे : २०१३ : चिपळूण : ना. कोत्तापल्ले ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स. मोरे ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो ९४वे : २०२१ : नाशिक : जयंत नारळीकर