इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे. 

1) माणिकतोळा कट खटलाअलीपूर कट:- 1908

बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.

2) नाशिक कट:- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.

3) दिल्ली कट:- 1912
रासबिहारी बोस.

4) लाहोर कट:- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.

5) काकोरी कट:- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.

6) मीरत/मेरठ कट:- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.

7) लाहोर कट:- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.

8) चितगाव कट:- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.

1) Alipur Khatla | Maniktola Kat |अलीपूर कट खटला:

यालाच माणिकतोळा कट खटला किंवा मुरारीपुकुर षडयंत्र असेही म्हणतात. कोलकातामधील माणिकतोळा येथे बॉम्ब निर्मिती कारखान्याचा सुगावा लागल्याने ब्रिटिशांनी अरविंद घोष, बरिंद्र घोष, उल्हास दत्त, हेमचंद्र दास आदी अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांवर खटला भरला. या खटल्यात कन्हैय्यालाल दत्त व एस. एन. बोस आदी अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांवर खटला भरला व त्यांना फाशी देण्यात आली.

हा खटला ‘माणिकतोळा कट’ म्हणून प्रसिद्ध आहे.

3) Delhi Kat Khatla | दिल्ली कट खटला:

जेव्हा 1912 ला ब्रिटिश भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला आणण्यात आली तेव्हा त्या वेळचा व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग्ज दिल्लीला आला होता. रासबिहारी बोस यांनी या दिवशी म्हणजेच 23 डिसेंबर 1912 ला लॉर्ड हर्डिंग्जवर दिल्लीमधील चांदणी चौकात बॉम्ब फेकला. या हल्यात हर्डिंग्ज बचावला पण त्याच्या हत्तीचा महावत मारला गेला.

या गुन्ह्यामध्ये बसंत कुमार विश्वास, बाल मुकुंद, अवध बिहारी व मास्टर अमीर चंद यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. रासबिहारी बोस जपानला जाण्यात यशस्वी झाले. हा खटला दिल्ली कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे.

5) Kakori Kat Khatala | काकोरी कट खटला:

या कटात चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल, अशफाकऊल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी आदि क्रांतिकारकांचा समावेश होता.
क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमविण्यासाठी त्यांनी रेल्वेतून जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी उत्तरप्रदेशमधील काकोरी रेल्वे स्टेशन जवळ लुटला.
अशफाकऊल्ला खान हा फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक ठरला. हा खटला काकोरी कट खटला म्हणून ओळखला जातो.

6) Meerut Kat | मीरत कट खटला:

1925 मध्ये श्रीपाद डांगे, जोगळेकर आदींनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली. 20 मार्च 1929 सरकारने या नेत्यांना अटक करण्यात आली.
हा खटला मीरत येथे चालल्याने तो ‘मीरत कट’ नावाने प्रसिद्ध आहे.

8) Chittagong Armoury Raid | चितगाव कट खटला:

18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी बंगालमधील चितगाव पोलीस शास्त्रागारावर हल्ला करून शास्त्रे लुटली. यामध्ये सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली अनंत सिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष यांच्याशिवाय कल्पना दत्त, प्रीतीलत्ता वड्डेदार, अंबिका चक्रवर्ती आदी महिलांचा समावेश होता. हा खटला चितगाव कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे.
शांती घोष व सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी केमिल्लाच्या जिल्हा न्यायधीशाचा वध केला. बिना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बांगाच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

सर्व खटल्यांची माहिती लवकरच टाकण्यात येईल.

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us