आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History part II

ब्रिटिश काळातील महान व्यक्ती व त्यांचे कार्य

राजा राममोहन रॉय (1772-1833)

  • आधुनिक भारताचा जनक, प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून ख्याती
  • जन्म 22 मे 1772, राधानगर (बरद्वान पश्चिम बंगाल).
  • 1817 – मध्ये कोलकाता येथे डेव्हिड हेयर यांच्या सहाय्याने ‘हिंदू कॉलेज’ स्थापना.
  • 1826 – हिंदू एकेश्वरी वादाच्या प्रसारासाठी कोलकता येथे वेदांत कॉलेजची स्थापना.
  • 1815 – आत्मीय सभेची स्थापना.
  • 1822 – ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना.

या दोन्ही संघटनांच्या एकात्रीकरणातून

  • 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राम्हो समाजाची स्थापना

‘एकेश्वरवाद, मूर्तिपूजा निषिद्ध’

  • 1821 – साली ‘संवाद्कौमोदी’ हे पाक्षिक सुरू केले.
  • 1822 – ला ‘मिरात-उल-अखबार’ हे पर्शियन वृत्तपत्र सुरू केले.
  • ब्रम्हनिकल मॅगझिन’ या मासिकातून ब्राम्हो समाजाच्या तत्वांचा प्रसार
  • अकबरशाहने रॉय यांना ‘राजा’ ही पदवी दिली.
  • वज्रसूची’ या ग्रंथाचे भाषांतर केले.
  • निधन: 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टल (इंग्लंड) येथे निधन.
  • रॉय यांच्या निधनानंतर 1844 साली महर्षी देवेन्द्रनाथ टागोर यांनी ब्राम्हो समाजाची धुरा वाहिली.

देवेन्द्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात वाद झाल्यानंतर 1866 साली केशवचंद्र सेन यांनी ‘भारतीय ब्राम्हो समाजा’ची स्थापना केली. यादरम्यान देवेन्द्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली मूळचा समाज हा ‘आदी ब्राम्हो समाज’ या नावाने ओळखला जाऊ लागला. भारतीय ब्राम्हो समाजातून केशवचंद्र यांचे अनुयायी फुटून त्यांनी ‘साधारण ब्राम्हो समाजाची’ स्थापना केली.

हिंदू संस्कृतीचा ‘आत्मा’ जागृत करण्याचे कार्य ब्राम्हो समाजाने केले.

‘First Voice of India’s Freedom’ या शब्दात डॉ. शिरीषकुमार मित्रा यांनी ब्राम्हो समाजाच्या कार्याचे कौतुक केले.

स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज (1824-1883)

  • जन्म: 20 सप्टेंबर 1824 टंकारा (गुजरात काठेवाड)
  • मूळ नाव: मूळशंकर करसनदास तिवारी
  • 10 एप्रिल 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना.
  • 1877: लाहोर येथे आर्य समाजाची शाखा.
  • स्वामी दयानंद यांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास साधणार्‍या ‘सत्यार्थप्रकाश’ या ग्रंथाची रचना केली.

आर्य समाजाचे तत्वज्ञान:

  • वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत.
  • परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिंदूमात्राचे कर्तव्य आहे.
  • वेद हा आर्यांचा पवित्र धर्मग्रंथ असून सर्व आर्यानी वेदप्रामाण्य मानले पाहिजे.
  • आर्यांच्या वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्मियांना खुले असावेत व शुद्धीकरणाने कोणासही या धर्मात प्रवेश मिळावा.
  • वेदांकडे चला ही शिकवण
  • भगिनी निवेदिता यांनी ‘लढाऊ हिंदू धर्म’ या शब्दांत आर्य समाजाची प्रशंसा केली आहे.
  • देशात अनेक ठिकाणी संस्कृत पाठशाळांची स्थापना.
  • 30 ऑक्टोबर 1833: विषप्रयोगामुळे निधन
  • आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज यांनी लाहोर येथे ‘दयानंद अँग्लोवेदिक कॉलेज’ स्थापन केले.
  • स्वामी श्रद्धानंद यांनी कांग्री (हरिद्वार) येथे ‘गुरुकुल’ ही संस्था स्थापन केली.
  • परधर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदूधर्मात आणण्याची ‘धर्मशुद्धीची क्रांतिकारी चळवळ’ आर्य समाजाने राबवली.

स्वामी रामकृष्ण परमहंस

19 व्या शतकात भारतात सुरू झालेल्या हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवणाच्या चळवळीस रामकृष्णांनी तेजस्वी रूप दिले.

गदाधर हे परमहंसांचे मूळ नाव.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन (1863-1902)

11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत उपस्थित राहून त्यांनी हिंदू धर्माचे महत्व जगाला पटवून दिले.

रामकृष्ण मिशन: 1 मे 1897 रोजी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण यांची स्मृती व कार्य यांच्या जाणिवेतून ‘रामकृष्ण मिशन’ या धर्मसंस्थेची स्थापना केली.

1899 साली कोलकाताजवळ बेलुर मठाची स्थापना केल्यानंतर बेलुर हे रामकृष्ण मिशनचे केंद्र बनले.

भगिनी निवेदिता : इंग्लंड मधील वास्तव्यात कुमारी मार्गारेट नोबेल ही विवेकानंदांची शिष्या बनली. हिंदू धर्म स्वीकारून ती भगिनी निवेदिता या नावे प्रसिद्धीस आली.

निर्वाण: 4 जुलै 1902 (बेलुर)

12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिन ‘युवक-दिन’ म्हणून साजरा केला जातो.

थिऑसॉफिकल सोसायटी (1875)

  • स्थापना: 1875 न्यूयॉर्क
  • संस्थापक: कर्नल हेनरी स्टील अलकॉट (अमेरिका) व मॅडम ब्लॅव्हास्की (रशिया)
  • उद्देश: प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करणे.
  • 1882 मध्ये मद्रास प्रांतातील अडयार येथे थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र स्थापन करण्यात आले.
  • नवाब अब्दुल लातिफ यांनी विज्ञान व शिक्षण यांच्या प्रसारासाठी बंगालमध्ये संस्था स्थापन केली – मोहमेडन लिटररी सोसायटी 1833
  • मुस्लिम समाजातील तरुणांना पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये ‘मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज’ स्थापन केले. याचेच पुढे ‘अलिगढ विश्व विद्यापीठात रूपांतर झाले.

बंगाल प्रांतातील राष्ट्रवादी संस्था:

  1. बंगाल प्रसारिका सभा (1836)
  2. लँड ओनर्स (holders) असोसिएशन: जुलै 1838
  • भारतातील पहिली राजकीय स्वरूपाची संघटना
  • बंगालमधील काही जमीनदारांनी (द्वारकानाथ टागोरांनी पुढाकार)
  • बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी : एप्रिल 1843
  • ब्रिटिश इंडियन असोसिएशन : 28 ऑक्टोबर 1851

लँड ओनर्स व बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन संस्थांच्या विलींनीकरणातून

अध्यक्ष: राधाकांत देव

सचिव: देवेन्द्रनाथ टागोर

  • इंडियन लीग 1875

बाबू शिरीषकुमार घोष यांनी लोकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी

  • इंडियन असोसिएशन 1876 (पहिली आखिल भारतीय चळवळ)

26 जुलै 1876 रोजी इंडियन लीगचे रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये

सुरेन्द्रनाथ बॅनर्जी व आनंदमोहन बोस यांनी स्थापना केली.

  • नॅशनल कॉन्फरन्स 1883

1885 मध्ये ही संस्था राष्ट्रीय सभेत विलीन झाली.

मद्रास इलाख्यातील राष्ट्रवादी संस्था

मद्रास नेटीव्ह अससोसिएशन :

ही संस्था कोलकातामधील ब्रिटिश इंडियन असोसिएशनची शाखा होती.

मद्रास महाजन सभा (मे 1884):

संस्थापक: सुब्रमन्यम अय्यर

भारताबाहेरील राष्ट्रवादी संस्था

  1. लंडन इंडियन सोसायटी:

स्थापना: 1865 लंडन

अध्यक्ष: दादाभाई नौरोजी

सचिव: व्योमेश्चंद्र बॅनर्जी

  • ईस्ट इंडिया असोसिएशन 1867

मेरी कारपेंटर या ब्रिटिश महिलेने स्थापना केली.

  • इंडियन सोसायटी 1872

केंब्रिज विद्यापीठात शिकत असताना आनंदमोहन बोस यांनी स्थापना केली.

इंग्लंडमध्ये राहणार्‍या भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागाविणे.

ब्रिटिशकालीन भारतातील संस्था व संस्थापक

  1. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल – 1783 – विल्यम जोन्स
  2. आत्मीय सभा (1815) ब्राम्हो सभा (1828) – राजा राममोहन रॉय
  3. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोशिएशन (1822) – राजा राममोहन रॉय
  4. भारतीय ब्राम्हो समाज (1866) – केशवचंद्र सेन
  5. नवविधान समाज (1880) – देवेन्द्रनाथ टागोर
  6. मानवधर्म सभा (सूरत) (1844) – दादोबा पांडुरंग, दुर्गाराम मंछाराम
  7. परमहंस सभा (गुप्तपणे अस्तित्वात) (मुंबई-1849) – दादोबा पांडुरंग व सहकारी
  8. प्रार्थना समाज (1867) – आत्माराम पांडुरंग व सहकारी
  9. बॉम्बे असोसिएशन (1852) – जगन्नाथ शंकरशेठ
  10.  सायंटिफिक सोसायटी (1865) – सय्यद अहमद खान
  11.  मोहमेडन अँग्लो ओरिएंटल (1875) – सय्यद अहमद खान
  12.  इंडियन पेट्रिओटीक असोसिएशन (1888) – सय्यद अहमद खान
  13.  मोहमेडन लिटररी सोसायटी (1833) – नवाब अब्दुल लतीफ
  14.  ईस्ट इंडिया असोसिएशन (लंडन 1866) (शाखा मुंबई-1871) – दादाभाई नौरोजी
  15.  आर्य समाज (स्थापना 1875 –मुंबई शाखा-लाहोर) – स्वामी दयानंद सरस्वती
  16.  थिओसोफिकल सोसायटी (न्यूयॉर्क) (1875) – कर्नल हेनरी स्टील अलकॉट व मॅडम ब्लॅव्हत्स्की (रशिया)
  17.  डेक्कन एजुकेशन सोसायटी (1884) – लो. टिळक, गो. ग. आगरकर
  18.  कॉंग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी (1820) – लो. टिळक
  19.  बॉम्बे मिल हँड असोसिएशन (पहिली कामगार सभा – 1884) – नारायण मेघोजी लोखंडे
  20.  मद्रास महाजन सभा (1884) – जी. सुब्रमन्यम अय्यर
  21.  इंडियन नॅशनल यूनियन (1884) – अॅलन ऑक्टोव्हीयन ह्युम
  22.  बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन (1885) – फिरोजशाह मेहता
  23.  इंडियन रेफोर्म्स असोसिएशन (इंग्लंड-1887) – दादाभाई नौरोजी
  24.  विधवा विवाहोत्तेजक मंडळ (पुणे-1865) – न्या. म. गो. रानडे
  25.  सामाजिक परिषद (1887) – न्या. म. गो. रानडे
  26.  औद्योगिक परिषद (1890) – न्या. म. गो. रानडे
  27.  पुना असोसिएशन (1867) – गणेश वासुदेव जोशी, न्या. म. गो. रानडे
  28.  सार्वजनिक सभा (पुणे-1870) – गणेश वासुदेव जोशी, न्या. म. गो. रानडे
  29.  रामकृष्ण मिशन (1897) – स्वामी विवेकानंद
  30.  मित्रमेळा (भगूर 1900) – वि. दा. सावरकर
  31.  अभिनव भारत (नाशिक 1904) – वि. दा. सावरकर
  32.  भारत सेवक समाज (1905) – गोपाळ कृष्ण गोखले
  33.  श्री नारायण धर्मपालन योगम (1903) – नारायण गुरु
  34.  डिप्रेस्ड क्लासेस मिशन (1906) – विठ्ठल रामजी शिंदे
  35.  मुस्लिम लीग (1906) – नवाब सलीमुल्ला, आगाखान (धर्मगुरू)
  36.  सत्यशोधक समाज (1873) – महात्मा फुले
  37.  हिंदू महासभा (1915) – पंडित मदनमोहन मालवीय
  38.  गदर पार्टी (अमेरिका 1913) – लाला हरदयाळ
  39.  हरिजन सेवक संघ (1932) – महात्मा गांधी
  40.  बहिष्कृत हितकारिणी सभा (1924) समता सैनिक दल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  41.  फॉरवर्ड ब्लॉक (1939) – सुभाषचंद्र बोस
  42.  आझाद हिंद सेना (1942) – रासबिहारी बोस

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us