सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 अपडेट | MPSC Assistant Motor Vehicle Inspector Exam 2020 Updates

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 फेरपडताळणीकरीता अर्ज करण्यास लिंक उपलब्ध

जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीकरीता अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना दिनांक 10/11/2022 ते 19/11/2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक (मुख्य) परीक्षा 2020 चा अंतिम निकाल दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
सादर परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर वेबलिंक दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रसिद्धीपत्रक पहा

अधिकृत वेबसाईट

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निकाल जाहीर | Assistant Motor Vehicle Inspector Exam 2020 Result Declared

जा. क्र. 59/2021 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रावर घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 233 उमेदवारांची या पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

प्रसिद्धीपत्रक पहा
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निवड यादी पहा
सर्व निकाल पहा

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us