ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020) या पुरस्कारांची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्या वतीने ‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  • ‘ICC मेन्स ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – विराट कोहली.
  • ‘ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड’ म्हणून ‘ICC सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार 2020’ याचा विजेता – विराट कोहली.
  • ‘ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – महेंद्रसिंग धोनी.
  • ‘ICC मेन्स टेस्ट प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया).
  • ‘ICC मेन्स T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – रशीद खान (अफगाणिस्तान).
  • ‘ICC विमेन्स प्लेअर ऑफ द डिकेड’, ‘रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार’, ‘ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ आणि ‘T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्कारांची विजेता – एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया).

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक मंडळ आहे. वर्ष 1909 मध्ये ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना झाली आणि वर्ष 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई या शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते.

  • 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले.
  • १२ वा वर्ल्ड कप २०१९ इंग्लंड येथे आयोजित करण्यात आला होता. हा कप इंग्लंड या देशाने जिंकला. न्यूझीलंड हा देश उपविजेता ठरला.
  • आगामी (१३ वा) क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ भारतामध्ये होणार आहे.

Be the first to comment on "ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020) या पुरस्कारांची घोषणा"

Leave a comment

Chat with us