पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण माहिती

पशुधन पर्यवेक्षक (गट-क) वेतनश्रेणी

S-8  (25500-81100)

पशुधन पर्यवेक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि

पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा

किंवा

महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळातर्फे किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

किंवा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणार दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

किंवा

महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. किंवा बी.व्ही.एस.सी. अँड ऍनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

पशुधन पर्यवेक्षक पदासाठी वयोमर्यादा

वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपेक्षा) जास्त नसावे.

वयोमर्यादेत खालीलप्रमाणे शिथिलता देण्यात येते.

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षापर्यंत
  • पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत
  • माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे. विकलांग माजी सैनिकांबाबत कमाल 45
  • वर्षापर्यंत.
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत.
  • अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत.

पशुधन पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा पद्धती

या पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येते. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.  यात किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. या परीक्षेत प्रत्येक प्रश्नास 2 गुण देण्यात येतात.

पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम

या पदाकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेऊन एकूण 120 गुणांची असते. तसेच व्यावसायिक चाचणी 80 गुणांची असते. यासाठी 2 तासाचा कालावधी असतो.

Chat with us