SRPF भरती नवीन GR | Police Bharti 2022 Latest Update
(26/06/2022) महाराष्ट्र शासन, गृह विभागातर्फे पोलीस भरतीशी निगडित एक अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार आता घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आधी मैदानी चाचणी होणार नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची असेल.
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र होतील.
लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
1) शारीरिक चाचणी (100 गुण)
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी खालीलप्रमाणे एकूण 100 गुणांची असेल.
शारीरिक चाचणी | गुण |
5 किमी धावणे | 50 |
100 मीटर धावणे | 25 |
गोळाफेक | 25 |
एकूण | 100 |
लेखी चाचणी
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय समाविष्ट असतील.
- अंकगणित
- बुद्धिमत्ता
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- मराठी व्याकरण
लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल, लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र असमजण्यात येतील.
पोलीस भरती नवीन GR | Police Bharti 2022 Latest Update
(26/06/2022) महाराष्ट्र शासन, गृह विभागातर्फे पोलीस भरतीशी निगडित एक अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार आता घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आधी मैदानी चाचणी होणार नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
- मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
- शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र होतील.
- लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
1) शारीरिक चाचणी (50 गुण)
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी खालीलप्रमाणे एकूण 50 गुणांची असेल.
अ. पुरुष उमेदवार
शारीरिक चाचणी | गुण |
1600 मीटर धावणे | 20 |
100 मीटर धावणे | 15 |
गोळाफेक | 15 |
एकूण | 50 |
ब. महिला उमेदवार
शारीरिक चाचणी | गुण |
800 मीटर धावणे | 20 |
100 मीटर धावणे | 15 |
गोळाफेक | 15 |
एकूण | 50 |
लेखी चाचणी
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय समाविष्ट असतील.
- अंकगणित
- बुद्धिमत्ता
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- मराठी व्याकरण
लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल, लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र असमजण्यात येतील.
(20-06-2022): गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्ट मध्ये 7231 पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यावेळी उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. (अजून GR आलेला नाही) मागील दोन वर्षांत नवीन पदांची भरती झालेली नाही. 2019 मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती दीड वर्षे चालली. 2020 मध्ये घोषित झालेली पदभरती अजून चालू झाली नाही.
महत्वाच्या बाबी:
- पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी.
- पहिल्या टप्यात 7231 पदांची होणार भरती.
- पोलीस नाईक झालेले होणार हवालदार, गृह विभागाने रद्द केले नाईक पद.